Join us

विन-डिप्पी एका निवांत क्षणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 21:27 IST

दीपिका पदुकोन आणि विन डिजेल हे एकत्र ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ एक्सझांडर केज’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहेत. दीपिका ...

दीपिका पदुकोन आणि विन डिजेल हे एकत्र ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ एक्सझांडर केज’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहेत. दीपिका तिच्या आगामी चित्रपटाचे विविध फोटो टिष्ट्वटरवर अपलोड करत असते. या चित्रपटात ती अ‍ॅक्शन स्टार विन डिजेलसोबत दिसणार आहे.तिचे चाहते चित्रपट रिलीज होण्याची अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत आहेत. नुकताच सेटवरून त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यात ते दोघेही एकमेकांसोबत अत्यंत खुश दिसत आहेत. डिप्पी काही बॅगवर डोके ठेवून झोपली आहे आणि तिच्या शेजारी विन हसताना दिसतो आहे. हा फोटो म्हणजे त्यांच्या शूटींगवरून घेतलेला वेलकम ब्रेक असू शकतो. सकाळच्या कोवळया उन्हात दोघेही मस्त निवांत बसलेले दिसत आहेत.}}}}