ALSO READ : भाईजान सलमान खानला‘लडकी मिल गयी’, दबंग खानच्या ट्विटमुळे लग्नाच्या चर्चांना उधाण
सलमान खान सध्या 'रेस 3' आणि 'भारत'ला घेऊन चर्चेत आहे. नुकतेच सलमानने 'रेस 3'च्या शूटिंगचे पहिले शेड्यूल मुंबईत पूर्ण केले आहे. 'रेस 3' मध्ये सलमानसोबत जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहे. हा चित्रपट 15 जूनला ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. 'रेस 3' मध्ये बॉबी देओल आणि डेजी शाहची देखील महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपट भारत बद्दल बोलायचे झाले तर त्याचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करतो आहे. अभिनेता व निर्माता अतुल अग्निहोत्री (सलमानची बहीण अलविरा खान हिचा पती) दीर्घकाळापासून या चित्रपटाचे प्लानिंग करतोय. सध्या या चित्रपटाची तयारी जोरात सुरु आहे. यात सलमान 18 वर्षांचा दिसणार आहे. ‘मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे. या टेक्निकसंदर्भात मेकर्सनी व्हिएफएक्स टीमसोबत चर्चा केली.आता यंग दिसायचे तर वजनही कमी करणे आलेच. त्यानुसार, पुढच्या काही आठवड्यात सलमानला वजनही कमी करावे लागणार आहे.
Here comes the BIGGG announcement... Salman Khan and Sajid Nadiadwala join hands for #Kick2... Directed by Sajid Nadiadwala... Christmas 2019 release... #DevilIsBackpic.twitter.com/J35C1AZtN7— taran adarsh (@taran_adarsh) February 7, 2018