Join us

वरूण करणार लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 14:13 IST

वरूण धवन आणि नताशा दलाल यांच्यातील नात्याबाबत मीडियात नेहमीच चर्चा असते. नताशाला आणि वरूणला अनेकवेळा एकत्रही पाहाण्यात आले आहे. ...

वरूण धवन आणि नताशा दलाल यांच्यातील नात्याबाबत मीडियात नेहमीच चर्चा असते. नताशाला आणि वरूणला अनेकवेळा एकत्रही पाहाण्यात आले आहे. पण वरूणने कधीच या नात्याबद्दल मीडियात कबुली दिलेली नाही. वरूणने तो राहात असलेल्या बिल्डिंगमध्ये एक नवीन फ्लॅट घेतला आहे आणि तिथे तो नताशासोबत राहाणार असल्याची चर्चा आहे. पण या सगळ्या चर्चा चुकीच्या असल्याचे वरूणने स्वतः म्हटले आहे. सध्या वरूणची एका नायिकेसोबत जवळीक असल्यामुळे नताशाला त्यांच्या नात्याबाबत भीती वाटत आहे. त्यामुळे लिव्ह इन मध्ये राहाण्याअगोदर साखरपुडा, लग्न करण्याचे तिने त्याला सुचवले आहे अशी चर्चा आहे. पण वरुणच्यामते तो लग्न करण्यासाठी खूपच लहान आहे.