Join us

अंकिता नसणार भन्साळींच्या ‘पद्मावती’ त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 11:37 IST

  संजय लीळा भन्साळी हा असा दिग्दर्शक आहे की, जो कलाकार त्याच्या चित्रपटात काम करतो त्याच्या करिअरला एकदम लिफ्ट मिळते. ...

  संजय लीळा भन्साळी हा असा दिग्दर्शक आहे की, जो कलाकार त्याच्या चित्रपटात काम करतो त्याच्या करिअरला एकदम लिफ्ट मिळते. करिअरच्या सुरूवातीला किंवा करिअरच्या मध्यंतरमध्ये कधीही काम केले तरी अभिनय मात्र अत्यंत उत्कृष्ट, सादरीकरण, मांडणी केली जाते. मात्र, असे असून देखील सुशांतसिंग राजपूतची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे ही संजय लीळा भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटात दिसणार नाही असे दिसतेय. खरंतर ती या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार होती. पण, सुत्रांच्या माहितीनुसार, अंकिताने हा चित्रपट साईन केलेला नाही.आता असे वाटतेय की, अफवा असावी. कारण बºयाच दिवसांपासून अंकिता लोखंडे ही भन्साळींच्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्याच्या विचारात आहे. ‘पवित्र रिश्ता’ मुळे अंकिता आणि सुशांतसिंग यांचे नाते जुळले आणि आता ते एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.