Join us

सुपरस्टार रजनीकांत करणार राजकारणात एन्ट्री? ट्रेंड करतोय #RajinikanthPoliticalEntry, उद्या करणार मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 16:07 IST

३० नोव्हेंबर रोजी सुपरस्टार रजनीकांत यांचा पक्ष रजनी मक्कल मंद्रमची एक महत्त्वाची मिटींग होणार आहे. या मीटिंगनंतर रजनीकांत राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटांचा क्रेझ चाहत्यांमध्ये नेहमीच पहायला मिळतो. रजनीकांत यांचे सिनेमे रिलीजपूर्वीच हिट होतात. यामागचे कारण म्हणजे संपूर्ण भारतात त्यांचा खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. बऱ्याच कालावधीपासून रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा ऐकायला मिळते. अशात रजनीकांत ३० नोव्हेंबरला तमीळनाडू विधानसभा निवडणूक २०२१ साठी मोठी घोषणा करू शकतात.

हे वृत्त समोर आल्यानंतर ट्विटरवर #RajinikanthPoliticalEntry हा हॅशटॅग ट्रेंड करतो आहे. यापूर्वी रजनीकांत २०१७ साली डिसेंबरमध्ये घोषणा केली होती की तमीळनाडूमध्ये राजकीय पक्षाची स्थापना केली पण त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूकीत सहभाग घेतला नव्हता. मात्र यावेळी ते राजकारणात निश्चित प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

रजनी मक्कल मंदरम पक्षाच्या एका जिल्हा सचिवने सांगितले की, आमच्या पक्षाला आशा आहे की रजनीकांत उद्या तमीळनाडू विधानसभा निवडणूक २०२१ लढणार आहेत की नाहीत याचा खुलासा करतील.

तर दुसरीकडे सोशल मीडिया युजर्सदेखील रजनीकांत यांच्या निर्णयाचे उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

रजनीकांत यांच्या चाहत्यांना त्यांना राजकारणात पहायचे आहे आणि ते सोशल मीडियावर सातत्याने प्रतिक्रिया देत आहेत.

टॅग्स :रजनीकांत