प्रभासच्या ‘बाहुबली २’ ला होणार का उशीर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 16:11 IST
२०१७ हे वर्ष उजाडताच प्रेक्षक प्रतिक्षेत असलेल्या चित्रपटांची चर्चा सुरू झाली. त्यात ‘बाहुबली २’ चं नावं आद्यक्रमाने आलंच. बहुचर्चित ...
प्रभासच्या ‘बाहुबली २’ ला होणार का उशीर?
२०१७ हे वर्ष उजाडताच प्रेक्षक प्रतिक्षेत असलेल्या चित्रपटांची चर्चा सुरू झाली. त्यात ‘बाहुबली २’ चं नावं आद्यक्रमाने आलंच. बहुचर्चित चित्रपट ‘बाहुबली’चा सिक्वेल ‘बाहुबली २’ ची शूटिंग डिसेंबर २०१६ पर्यंत संपायला हवी होती. मात्र, अद्याप त्याची शूटिंग सुरूच असल्याने दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याच्या सिक्वेलला आता उशीर होणार की काय ? अशी भीती चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. शूटिंग पूर्ण झाल्याचे जाहीर करण्याअगोदर त्यांना काही सीन्सचे पॅचवर्क करावे लागणार असून, त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अजून लांबणार, अशी चर्चा सुरू झालीय. चित्रपटाच्या सेटवरून ज्येष्ठ तांत्रिक सल्लागार यांनी सांगितले की,‘ चित्रपटाची रिलीज डेट लांबत असल्याने आम्हाला देखील काळजी लागून राहिली आहे. पण, सध्या चित्रपटातील काही सीन्सवर पॅचवर्क सुरू आहे. पण, एप्रिल महिन्याच्या आतच चित्रपट रिलीज होणार असून सर्व चाहत्यांना याचे उत्तर मिळणार आहे की, ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले? ’ मात्र, तुम्हाला माहितीये का की, चित्रपटाची रिलीज डेट लांबत जाण्याचा एका कलाकाराला खूप त्रास होतोय. कोण आहे हा कलाकार? होय, प्रभास म्हणजेच बाहुबली. त्याला त्याच्या आगामी चित्रपटासाठी तयारी सुरू करावयाची आहे. मात्र, या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम पूर्ण झाल्याशिवाय त्याला आगामी प्रोजेक्टवर काम करता येणार नाही. आगामी चित्रपटासाठी त्याला नव्या लूकवर काम करावयाचे असून, त्याची चांगलीच गोची झाली आहे.’ ‘बाहुबली : द बिगिनिंग’ हा पहिला भाग चित्रपटातील व्हिज्युअल्स, युद्धाचे सीन्स, आर्किटेक्ट यांच्यामुळे चांगलाच गाजला. बॉक्स आॅफिसवर चित्रपटाने केलेल्या रेकॉर्डब्रेक कमाईमुळे आता बाहुबली हा एक ब्रँड बनला आहे. आता चित्रपटाच्या टीमला अॅक्शन सीक्वेन्ससाठी खास एक्स्पर्टला सेटवर बोलवावे लागतेय. राणा डग्गुबती, तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी आणि प्रभास यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपटाच्या सिक्वेलची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच आपल्याला कळणार आहे की,’कटप्पाने बाहुबली को क्यूँ मारा?’