Join us
Daily Top 2Weekly Top 5

ना परी, ना सोना अर्जुनसोबत दिसणार डायना ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 16:21 IST

अनीस बाझमी यांचा ‘मुबारकाँ’ चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. अर्जुन कपूरला मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत घेण्यात आले असून अभिनेत्रीच्या जागेवर कोणाला ...

अनीस बाझमी यांचा ‘मुबारकाँ’ चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. अर्जुन कपूरला मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत घेण्यात आले असून अभिनेत्रीच्या जागेवर कोणाला घेण्यात येईल हे काहीच सांगता येत नाहीये.कारण प्रथम अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी परिणीती चोप्राला घेण्यात आले होते. त्यानंतर सोनाक्षी सिन्हाचे नाव पुढे आले. मात्र आता डायना पेंटी हिलाच अर्जुनसोबत घ्यायचे असे ठरले आहे. अनिल कपूर आणि अर्जुन कपूर हे प्रथमच या चित्रपटात एकत्र दिसतील.मिलाप झव्हेरी हे अगोदर चित्रपट दिग्दर्शित करणार होते मात्र आता अनीस बाझमी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील. डायनाने अद्याप निश्चित सांगितले नाहीये. ती लवकरच ‘हॅप्पी भाग जायेगी’ चित्रपटात दिसणार आहे.