Join us  

धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबापासून दूर राहतात हेमा मालिनी, करण देओल-द्रिशाच्या लग्नात लावणार हजेरी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 3:36 PM

सनी देओल यांचा मोठा मुलगा करण देओलच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी कुठेच दिसल्या नाहीत.

सनी देओल यांचा मोठा मुलगा करण देओल त्याची दीर्घकाळाची गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत १८ जून रोजी मुंबईत लग्न करणार आहे. सनी देओल यांचा बंगला फुलांनी आणि दिव्यांनी सजवला आहे आणि लग्नाआधीच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये देओल कुटुंबातील सर्व जवळचे नातेवाईक दिसले, परंतु धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली ईशा आणि आहाना देओल कुठेही दिसल्या नाहीत.

आता लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली लग्नाला उपस्थित राहणार का?  एबीजी न्यूजच्या रिपोर्टनुसार, हेमा मालिनी यांनी धर्मेंद यांच्या पहिल्या कुटुंबापासून नेहमीच आदरपूर्वक अंतर ठेवले आहे. रिपोर्टनुसार ईशा देओल आणि आहना देओल दोघी लग्नाला उपस्थित राहू शकतात. भावाच्या नात्याने सनी देओल यांनी ईशा आणि आहानाला लग्नाची आमंत्रणे दिली आहेत. दोघेही लग्नाला हजेरी लावू  शकतात.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा धर्मेंद्र यांचं आधीच लग्न झालं होतं. ते आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायलाही तयार नव्हते. पहिल्या पत्नीला न सोडताच त्यांना हेमामालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न करायचं होतं.धर्मेंद्र यांचं 1957 अगदी लहान वयात लग्न झालं होतं. प्रकाश कौर या त्यांच्या पहिल्या पत्नी. त्यांना मुलंही झाली होती. अखेर त्यांनी धर्म बदलण्याचा निर्णय घेतला आणि 1980 मध्ये हेमामालिनी यांच्याशी दिसरे लग्न केले.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचं लग्न झालं तरी त्या कधीच सासरी गेल्या नाहीत. त्या नेहमी वेगळ्याच राहिल्या. त्यांनी धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबापासून वेगळं राहायचं हे दोघांनी ठरवलं होतं.धर्मेंद्र यांनी लग्नापूर्वी ही अटच घातली होती आणि हेमाजींनी ती कायम पाळली.

टॅग्स :हेमा मालिनीधमेंद्र