Join us

​‘देवसेना’ अन् ‘अवंतिका’ पुन्हा येणार का एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 16:16 IST

‘बाहुबली’पूर्वी साऊथची ब्युटी अनुष्का शेट्टी बॉलिवूडला फार परिचित नव्हती. साऊथची ग्लॅमरस डॉल तमन्ना भाटिया हिच्याबद्दलही तेच होते. नाही म्हणायला ...

‘बाहुबली’पूर्वी साऊथची ब्युटी अनुष्का शेट्टी बॉलिवूडला फार परिचित नव्हती. साऊथची ग्लॅमरस डॉल तमन्ना भाटिया हिच्याबद्दलही तेच होते. नाही म्हणायला तमन्नाने अनेक बॉलिवूड चित्रपटांत काम केले होते. अर्थात तरिही बॉलिवूडमध्ये तिला फार लोकप्रीयता मिळाली नव्हती. पण ‘बाहुबली’ आला अन् अनुष्का व तमन्ना दोघीही कमालीच्या लोकप्रीय झाल्या. साऊथ इंडस्ट्रीतील या अभिनेत्रींची लोकप्रीयता बॉलिवूडपर्यंत पोहोचली. आता बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींप्रमाणेच अनुष्का व तमन्ना या दोघींकडेही चाहत्यांचे लक्ष असते. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. चाहत्यांची उत्सुकता शमवणारी अशीच एक बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. होय, अनुष्का शेट्टी व तमन्ना भाटिया या दोघीही ‘बाहुबली’नंतर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करण्याची शक्यता आहे. हा चित्रपट एक महिलाप्रधान चित्रपट असल्याचे सांगण्यात येतेय.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्काची सध्या निर्माता गौतम मेननसोबत एका प्रोजेक्टवर चर्चा सुरु आहे. हा चित्रपट एक द्विभाषिक चित्रपट आहे. म्हणजे, तेलगू आणि तामिळ अशा दोन भाषांमध्ये हा चित्रपट तयार होणार आहे. या चित्रपटात अनुष्कासोबत तमन्नाही झळकणार, अशी खबर आहे. अर्थात गौतम मेनन यांच्या निकटस्थ सूत्रांनी ही बातमी अफवा असल्याचे म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का गौतम मेनन यांना भेटली होती. पण ही भेट एका मल्टी स्टारर प्रोजेक्टसंदर्भात होती. या प्रोजेक्टवर मेनन गत वर्षभरापासून काम करत आहेत. या चित्रपटात चार हिरो असतील व ते वेगवेगळ्या इंडस्ट्रीतून असतील. आता काय खरे काय खोटे., हे लवकरच कळेल. पण ‘देवसेना’ व ‘अवंतिका’ पुन्हा एकदा एकत्र आल्यास प्रेक्षकांना ते हवेच आहे. तुमचे याबद्दल काय मत आहे, ते आम्हाला जरूर कळवा. खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया लिहू शकता.अनुष्का शेट्टीने अनेक तामिळ व तेलगू चित्रपटांत काम केले आहे. गौतम मेननसोबत याआधीही तिने काम केले आहे. अनुष्का शेट्टीचा ‘भागमती’ हा चित्रपट तूर्तास प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.