Join us

बाळासाहेबांची भूमिका अक्षय साकारणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 12:50 IST

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर बनणाऱ्या चित्रपटात बाळासाहेबांची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी मी योग्य आहे किंवा नाही हे मी ठरवू ...

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर बनणाऱ्या चित्रपटात बाळासाहेबांची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी मी योग्य आहे किंवा नाही हे मी ठरवू शकत नाही असे अक्षय कुमारने म्हटले आहे. रुस्तम चित्रपटाच्या यशानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना अक्षयला बाळासाहेबांची भूमिका करायला आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अक्षयने बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी मी फीट बसेन की, नाही हे मी सांगू शकत नाही. चित्रपटाचे जे निर्माते आहेत त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे असे अक्षयने सांगितले.  बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी कुठला कलाकार तुला योग्य वाटतो या प्रश्नावर अक्षयने, ते मला सांगता येणार नाही असे उत्तर दिले. बाळासाहेब हे लहान व्यक्तीमत्व नाही. बाळासाहेब खूप मोठे होते असे अक्षयने सांगितले. बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी ज्यांच्या नावाचा विचार सुरु आहे त्यामध्ये अक्षयचे एक नाव आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा नातू राहुल आणि सूनबाई स्मिता बाळासाहेबांच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती करत आहात