Join us

बॉयफ्रेंड इवानो फुच्ची सोबत गायिका श्वेताने केले लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 13:44 IST

इवानो व श्वेता हे दोघेही मागील अनेक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. इवानो यांनी इंस्टाग्रामवर लग्नाचा एक फोटो शेअर करुन त्यासोबत लिहीले ...

इवानो व श्वेता हे दोघेही मागील अनेक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. इवानो यांनी इंस्टाग्रामवर लग्नाचा एक फोटो शेअर करुन त्यासोबत लिहीले आहे की, कायद्यानुसार आम्ही लग्न केले असून एका महिन्यात जोधपूर व मुंबईमध्ये लग्नाची मोठी पार्टी होणार आहे.श्वेताचे पती इवानो हे व्यावसायीक व चित्रपट निर्माते आहेत.श्वेताने शाहरुख खानच्या  ‘मोहब्बते ’चित्रपटात पाच गाणी गायिलेली आहेत. श्वेताची ही सर्वच गाणी मल्टी सिंगर्स राहिली आहेत. तिने ‘साज’, ‘दिल क्या करे’, ‘राजू चाचा ’तसेच ‘नई पडोसन’,‘ जूली’, ‘कभी अलविदा न कहना’, ‘वेलकम बॅक’, ‘यमला पगला दीवाना’, ‘सत्याग्रह’, ‘हाईवे’,‘गुड्डू की गन’ आदी चित्रपटातही गाणी गायिलेली आहे. तिने अनिल कपूरच्या शो ‘24’ मध्ये अ‍ॅक्टींग केलेली आहे.