Join us

"गोविंदाने चांगल्या मुलाशी माझं लग्न लावून द्यावं...", असं का म्हणाली सुनिता अहुजा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:05 IST

सुनीताने केलेल्या वक्तव्याने मात्र सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. गोविंदाने माझं चांगल्या मुलाशी लग्न लावून द्यावं असं सुनीता म्हणाली आहे. पण, ती नेमकं असं का म्हणाली, याबाबत जाणून घेऊया. 

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चाही रंगल्या होत्या. गोविंदा आणि सुनिता गेल्या काही वर्षांपासून एकत्र राहत नाहीत. अनेकदा सुनीताने त्यांच्या नात्याबाबत उघडपणे भाष्यही केलं आहे. आता सुनीताने केलेल्या वक्तव्याने मात्र सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. गोविंदाने माझं चांगल्या मुलाशी लग्न लावून द्यावं असं सुनीता म्हणाली आहे. पण, ती नेमकं असं का म्हणाली, याबाबत जाणून घेऊया. 

सुनीता अहुजाने पिंकविलाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने गोविंदासोबतच्या नात्यावर भाष्य केलं. "चाळीस वर्षांपूर्वी गोविंदा खूप साधा होता. पण, आता तो तसा राहिलेला नाही. गोविंदा म्हणाला की मी ज्या गोष्टी बोलायच्या नाहीत त्यादेखील बोलून जाते. तो मला बच्चा म्हणतो. आमची मुलंही माझी काळजी घेतात, असंही गोविंदा म्हणाला. आम्ही तर तेच करतो जे आमचे वडील आम्हाला शिकवतात. मी गोविंदाला एकदा म्हणाले होते की तू प्रत्येक वेळी म्हणतोस की मी अजून मोठे झालेले नाही. मी अजूनही लहान मुलांसारखं वागते. मी तुला टीनासारखी वाटते तर माझं लग्न लावून दे", असं सुनीता अहुजा म्हणाली. 

पुढे ती म्हणाली, "तुझी जर तीन मुलं आहेत... सुनीता, टीना आणि यश. तर मग सगळ्यात मोठी मुलगी तर मी आहे ना... तू जर मला तुझी मुलगीच मानतोस तर मग माझं एखाद्या चांगल्या मुलासोबत लग्न लावून दे. तेव्हा तो मला म्हणाला की आता एवढंच बाकी राहिलं आहे. तू पण मुलगा शोध".  

टॅग्स :गोविंदासेलिब्रिटी