Join us

धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचा फोटो का बरं होत असावा व्हायरल?, वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 16:12 IST

अभिनेता बॉबी देओल याने नुकताच त्याच्या लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ज्यामध्ये तो पापा धर्मेंद्र आणि आई ...

अभिनेता बॉबी देओल याने नुकताच त्याच्या लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ज्यामध्ये तो पापा धर्मेंद्र आणि आई प्रकाश कौर यांच्यासोबत बघावयास मिळत आहे. बॉबीने हा फोटो ट्विटरवर शेअर करताना लिहिले की, ‘the Loves of my life so blessed to be their child’ बॉबीने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहणाºया प्रकाश कौर अचानकच प्रसिद्धीझोतात आल्या आहेत. त्यांच्याविषयी सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.  असो, धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्याविषयी सांगायचे झाल्यास, धर्मेंद्र यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यामुळेच त्यांना एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखले जाते. चित्रपटांबरोबरच ते त्यांच्या व्यक्तिगत जीवनामुळेही नेहमीच चर्चेत राहिले. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केले. या दोघांना चार मुले आहेत. सनी देओल, बॉबी देओल, विजेता आणि अजिता. जेव्हा धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले तेव्हा त्यांना अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी लग्न करायचे होते. त्यासाठी त्यांनी प्रकाश कौर यांना घटस्फोट देण्याचे ठरविले. परंतु तसे होऊ शकले नाही. धर्मेंद्र अगोदरच विवाहित असल्याने ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांच्यासोबत विवाह करताना त्यांना बºयाचशा अडचणींचा सामना करावा लागला. अशात त्यांनी धर्मांतर करून हेमा मालिनी यांच्याबरोबर विवाह केला. जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा यांचा विवाह झाला तेव्हा धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी लग्नायोग्य झाली होती. शिवाय सनी देओल चित्रपटात येण्याची तयारी करीत होता. अशातही त्यांनी २ मे १९८० मध्ये हेमाबरोबर विवाह केला. जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा यांचे लग्न झाले त्यावेळी हेमा मालिनी इंडस्ट्रीमधील क्रमांक एकच्या अभिनेत्री होत्या. दरम्यान, बॉबीने हा फोटो शेअर करून या सर्व आठवणींना उजाळा दिला आहे. तब्बल चार वर्षांनंतर इंडस्ट्रीत कमबॅक करणाºया बॉबीच्या करिअरची सुरुवात ‘बरसात’ या चित्रपटाने झाली. त्यावेळी हा चित्रपट चांगला हिट ठरला, परंतु अशातही त्याचे करिअर फ्लाप झाले. नुकत्याच रिलीज झालेल्या त्याच्या ‘पोस्टर बॉइज’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखविला नाही. एका मुलाखतीदरम्यान बॉबीने सांगितले की, ‘मी गेल्या चार वर्षांत काहीच केले नाही. कदाचित मी अपीलिंग नसेल किंवा मला जसा अपेक्षित होती तशी मला भूमिका मिळाली नाही. त्यावेळी मी डिप्रेशनमध्ये गेलो होता, परंतु पत्नी तान्याने मला आधार दिल्याचेही त्याने सांगितले.