...यामुळे शाहरूखने घेतली सैफची जागा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 14:39 IST
करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटात अनुष्का शर्मा, ऐश्वर्या रॉय बच्चन, रणबीर कपूर आणि फवाद खान हे दिसणार ...
...यामुळे शाहरूखने घेतली सैफची जागा?
करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटात अनुष्का शर्मा, ऐश्वर्या रॉय बच्चन, रणबीर कपूर आणि फवाद खान हे दिसणार असून शाहरूख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असे कळाले होते.या चित्रपटात अगोदर शाहरूख खानच्या जागेवर आधी सैफ अली खानला घेण्यात आले होते. सैफ ने मागील वर्षीच या भूमिकेसाठी शूटींग केले होते. त्याच्या भूमिकेला आणखी ‘टच-अप’ करण्याचे काम शिल्लक राहिले असताना त्याला दुखापत झाली.काला कंदी च्या शूटींगवेळी त्याच्या हाताला जखम झाली. त्यामुळे सैफ शूट करू शकणार नव्हता. त्यानंतर करणकडे काहीही पर्याय नव्हता. त्यामुळे त्याने सैफच्या जागेवर शाहरूखला घेतले.