नवाजुद्दीन पार्टीत का जात नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 16:03 IST
नवाजुद्दीन सिद्दीकी हा व्हर्साटाईल अॅक्टर म्हणून ओळखला जातो. त्याला काही अवधीतच मिळालेल्या प्रसिद्धीमुळे साहजिकच त्याला पार्टीजमध्ये आमंत्रित केले जाते, ...
नवाजुद्दीन पार्टीत का जात नाही?
नवाजुद्दीन सिद्दीकी हा व्हर्साटाईल अॅक्टर म्हणून ओळखला जातो. त्याला काही अवधीतच मिळालेल्या प्रसिद्धीमुळे साहजिकच त्याला पार्टीजमध्ये आमंत्रित केले जाते, मात्र तो पार्टीत जात नाही. आता या जमान्यातही असे अभिनेते असू शकतात, हे कदाचित आपल्याला खरे वाटणार नाही! हे स्वत: नवाजनेच कबुल केले आहे.मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही गोष्ट कबूल केली आहे. त्याला पार्टीजमध्ये जाणे प्रशस्त वाटत नाही. बॉलिवूडचा भाई सलमान यानेही आता नवाजला पार्टीत बोलावणे जवळपास बंद केले आहे. ‘यापूर्वी सलमानभाई मला नेहमीच पार्टीत बोलावत असत, परंतू मी अशा पार्टीज टाळतो. मला कोणीही पार्टीला बोलाविले तरी मी आता ‘नाही’ असेच म्हणतो. अशा देसी पार्टीजमध्ये जावेसे वाटत नसल्याचेही नवाजने सांगितले.सलमान खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी याने बजरंगी भाईजान आणि किक या चित्रपटात एकत्र काम केले आहे. सलमानने आपल्या ५१ व्या वाढदिवसानिमित्ताने दिलेल्या पार्टीतही नवाज सहभागी झाला नव्हता. सलमान, शाहरूख आणि आमिर या तिन्ही खानांसोबत त्याने काम केले आहे. या तिघांविषयी बोलताना नवाज म्हणाला, ‘ शाहरूख आणि सलमान हे वेगळे आहेत. प्रत्येकाचे सौंदर्य वेगवेगळे होते. ते दोघेही एकमेकांविषयी आकसबुद्धीने वागत नाहीत.’सध्या नवाजुद्दीन सिद्दीकी हा मंटो या चित्रपटात काम करीत आहे. नंदिता दास ही चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे.