सलमानच्या लग्नाने का घाबरला जॉन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 16:34 IST
काही दिवसांपूर्वी सल्लूमियाँला विचारण्यात आले होते की,‘ तू खरंच मियाँ कधी बनणार आहेस? तेव्हा त्याने सांगितले होते की, १८ ...
सलमानच्या लग्नाने का घाबरला जॉन?
काही दिवसांपूर्वी सल्लूमियाँला विचारण्यात आले होते की,‘ तू खरंच मियाँ कधी बनणार आहेस? तेव्हा त्याने सांगितले होते की, १८ नोव्हेंबरला तो लग्न करणार आहे. मात्र, अद्याप वर्ष ठरवलेले नाही. ‘ढिशूम’ च्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये बोलताना जॉनला एक प्रश्न विचारण्यात आला होता.त्यावर तो म्हणाला,‘ फोर्स २ त्याच दिवशी रिलीज होणार असून भाई जर त्या दिवशी लग्न करणार असेल तर मी माझ्या चित्रपटाची तारीख बदलू शकतो. दुसरी तारीख तो त्यावेळी ठरवण्याच्या विचारात होता.यावरून आपल्याला भाईचे किती वजन आहे हे कळते. फोर्स २ मध्ये मुख्य भूमिकेत जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा हे असणार आहेत. चित्रपट अॅक्शन-ड्रामा असून रोहित धवन हे दिग्दर्शक आहेत.