अनुष्काची अलीकडची ‘फिल्मोग्राफी’ बघितली की, ते लक्षात येईल. २०१७ मध्ये अनुष्काचा ‘ओम नमो व्यंकटेशा’ हा सिनेमा आला होता. याच वर्षांत अनुष्का ‘बाहुबली2’मध्ये दिसली. यापैकी ‘बाहुबली2’ सुपरडुपर हिट ठरला. पण या चित्रपटाचे सगळे यश अभिनेता प्रभासच्या खात्यात जमा झाले. अनुष्काची झोळी त्यामानाने रिकामीचं राहिली. ‘ओम नमो व्यंकटेशा’ ही बॉक्सआॅफिसवर फार कमाई करू शकला नाही. २०१५ मध्ये अनुष्काचा ‘साईज झिरो’ हा सोलो हिट आला होता. तेव्हापासून अनुष्काला एका मोठ्या हिटची वाट पाहतेय. तीन वर्षांनंतर कदाचित ‘भागमती’मुळे अनुष्काला ती संधी मिळण्याची शक्यता आहे. एकटीच्या खांद्यावर मी चित्रपट हिट करू शकते, हे सिद्ध करण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे. आता अनुष्का संधीचे सोने कसे करते, ते बघूच.
येत्या २६ तारखेला हा चित्रपट रिलीज होतो आहे. अर्थात तेलगू, तामिळ, मल्याळममध्ये. जी. अशोकने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘भागमती’मध्ये अनुष्का गरिबांना मदत करणाºया एका आईएएस आॅफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. याचदरम्यान तिच्यावर जेलमध्ये जाण्याची वेळ येते. भागमती हा एक हॉरर थ्रिलर चित्रपट आहे.