Join us

​‘शिवाय’साठी अजयने सायेशाची का केली निवड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 16:32 IST

अजय देवगण याचा ‘शिवाय’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि काही पोस्टर्स पाहिल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सूकता ...

अजय देवगण याचा ‘शिवाय’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि काही पोस्टर्स पाहिल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सूकता चांगलीच वाढली आहे.‘शिवाय’मध्ये अजय देवगण दुहेरी भूमिकेत आहे. म्हणजेच यात अजय अ‍ॅक्टिंग करताना दिसणार आहे. सोबतच तो या चित्रपटाचे दिग्दर्शनही करतो आहे. अजयच्या अपोझिट सायेशा सहगल हा नवाकोरा चेहरा ‘शिवाय’मध्ये दिसणार आहे. सायेशाला ‘शिवाय’मध्ये रोल देण्यामागचे मुख्य कारण काय,याचे उत्तर अजयने दिले आहे. अजयच्या मते, सायेशा ब्युटी अ‍ॅण्ड टॅलेन्टचे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. होय, सायेशा एक ब्रिलिअंट परफॉर्मर असल्याचे अजयचे मत आहे.  मी सायेशाची स्क्रीन टेस्ट पाहिली, तेव्हा तिच्यातील गुण मी पारखले होते. सायेशा केवळ दिसायला सुंदर नाही तर ती एक उत्तम अभिनेत्री आहे, हे मला मनोमन पटले. ‘शिवाय’ परफॉमन्स ओरिएन्टेड फिल्म आहे. मला या चित्रपटासाठी सायेशा सारखीच चाणाक्ष व हुशार अभिनेत्री हवी होती आणि म्हणूनच मी सायेशाची निवड केली,असे अजय म्हणाला..व्वा, सायेशा..तेरी तो निकल पडी..!!