Join us

का करु शकत नाही आमिर खान मल्टीटास्किंग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:44 IST

आमिर खान हा मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जात असला तरी एकाच वेळी अनेक कामे तो करु शकत नाही. खुद्द ...

आमिर खान हा मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जात असला तरी एकाच वेळी अनेक कामे तो करु शकत नाही. खुद्द आमिर खाननेच ही कबुली दिली आहे. आपण मल्टीटास्किंग करु शकत नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.कोल्हापुरात आमिर हा ‘लोकमतची दंगल’ या कार्यक्रमास आला असताना त्याने ही कबुली दिली. ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटापासून बॉलीवूडचा सिनेमा कसा बदलत गेला आणि तारे जमीन पर ते दंगल इतक्या चित्रपटांचा भाग असताना त्याला काय वाटते यावर याबद्दल बोलताना आमिर म्हणाला, मी ज्यावेळी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यावेळी हिरो एकावेळी २५ ते ३० चित्रपट करायचे. पाच दिवस एका चित्रपटासाठी, पाच दिवस दुसºया चित्रपटासाठी तर दहा दिवस तिसºया चित्रपटासाठी असे चालायचे. सुरुवातीला आमिरला हे खूपच आश्चर्यकारक वाटले. आमिरने दहा ते १५ चित्रपट करण्याचा प्रयत्न केला. त्यातही त्याला यश आले नाही. त्यामुळे चित्रपट उद्योगापेक्षा वेगळे म्हणजे दोन ते तीन चित्रपट करण्याचा त्याने प्रयत्न केला. आमिर ज्यावेळी एखाद्या चित्रपटात काम करतो, त्यावेळी तो त्या भूमिकेशी खूप समरस होतो. तो त्या चित्रपटाचा भाग बनून जातो. त्यातच तो सुखी असतो. याचा असाही अर्थ होतो की, तो ज्यावेळी एखादा प्रोजेक्ट सोडतो त्यावेळी त्यापासून दूर जातो. म्हणजे २३ तारखेनंतर आमिर दंगलचा भाग नसेल. त्याच्या मते २३ तारखेनंतर दंगल हा लोकांचा भाग असेल. तो आमिरचा चित्रपट राहणार नाही. दंगल चित्रपटाविषयी त्यांचा काय अनुभव आहे आणि यातून त्या काय शिकल्या या प्रश्नावर चित्रपटाच्या अभिनेत्री फातिमा शेख आणि सानिया मल्होत्रा यांनी आमिर खानचे कौतुक केले. त्याच्याइतके दुसरे व्यक्तिमत्व पाहिले नसल्याचे सांगितले. आमिर खानकडे सभोवतालच्या प्रश्नांसंदर्भात संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव आहे, असे त्या म्हणाल्या.दंगलच्या शूटिंगदरम्यान आपल्याला कुटुंबाप्रमाणे वाटले. ज्यावेळी हा चित्रपट प्रदर्शित होईल, त्यावेळी या सर्वांपासून दूर असू असे सांगत मला खूप वाईट वाटेल, असे सानिया म्हणाली.