Join us

अनिल कपूर मुलगी सोनम कपूरच्या मोबाइलमध्ये का बरं डोकावत असेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 14:49 IST

एका कार्यक्रमात अनिल कपूर मुलगी सोनमच्या मोबाइलमध्ये डोकावत होता. त्याचा हा फोटो त्यावेळी क्लिक करण्यात आला.

अभिनेता अनिल कपूर त्याच्या मुलांविषयी खूप प्रोटेक्टिव आहे. तो नेहमीच हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीता असतो की, अखेर त्याच्या मुली काय करीत आहेत. ६० वर्षाच्या अनिलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये तो मुलगी सोनम कपूरच्या मोबाइलमध्ये डोकावताना दिसत आहे. तर सोनम मोबाइलमध्ये काही बघण्यात दंग असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अनिलने लिहिले की, ‘ओव्हर प्रोटक्टिव्ह वडील कॅमेºयात कैद झाला. हा क्षण खरोखरच खूप महत्त्वाचा आहे.’ पुढे त्याने लिहिले की, ‘बंदुका लोकांना नाही मारत परंतु सुंदर मुली एका वडिलांना मारतात.’ अनिल कपूरने त्याची चुक स्विकारताना लिहिले की, ‘मला असे वाटते की मी दोषी आहे.’ या फोटोला कॉमेण्ट देताना सोनमचा कथित बॉयफ्रेंड आनंद आहूजाने लिहिले की, ‘ह पुर्णत: स्विकार्य आहे.’असो, हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा हे दोघे वॉग वूमेन आॅफ द ईयर अवॉर्ड्समध्ये सहभागी झाले होते. हा कार्यक्रम याच विकेण्डला मुंबई येथे पार पडला. यावेळी सोनमला वॉग आणि आयडब्ल्यूसी फॅशन आयकन आॅफ द ईयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास, सोनम सध्या करिना कपूर-खान, शिखा तल्सानिया आणि स्वरा भास्कर यांच्यासोबत ‘वीरे दी वेडिंग’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाला सोनमची बहीण रीया आणि एकता कपूर या दोघी प्रोड्यूस करीत आहे. तर शशांक चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे. काही दिवसांपूर्वीच सोनम आनंद आहूजाबरोबर लंडन येथे एक मित्राच्या लग्नात पोहोचली होती. यावेळी या दोघांनी लग्नातील बरेचसे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. सोनम आणि आनंदने कधीही त्यांच्यातील रिलेशनशिपविषयी जाहिरपणे सांगितले नाही. दोघेही त्यांचे नाते प्रायव्हेट ठेवू इच्छितात. मात्र प्रत्येकवेळी हे दोघे एकत्र बघावयास मिळत असल्याने त्यांच्यात काही तरी जवळचे नाते असावे अशी नेहमीच चर्चा रंगत असते. फॅमिली फंक्शन असो वा लग्न समारंभ हे दोघे हमखास एकत्र बघावयास मिळतात. त्याचबरोबर लंच डेट्स आणि पार्ट्यांमध्येही हे दोघे एकत्र दिसतात. या दोघांनी एकमेकांचे बर्थ डे स्पेशल बनविण्यासाठी एकत्र वेळ व्यतित केला. कारण सोनम तिच्या बर्थ डेला आनंद आणि बहीण रियासोबत दिल्ली येथे पोहोचली होती. तर आनंदच्या बर्थडेला सोनम न्यूयॉर्कला गेली होती.