Join us

का मिळते अभिनेत्यांच्या तुलेनत अभिनेत्रींना कमी मानधन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 16:21 IST

बॉलिवूड प्रमाणेच साऊथची फिल्म इंडस्ट्री म्हणजेच वर्षाला शेकडो चित्रपट तयार करत असते. बॉलिवूडप्रमाणे साऊथमध्ये ही तयार होणाऱ्या चित्रपट ही ...

बॉलिवूड प्रमाणेच साऊथची फिल्म इंडस्ट्री म्हणजेच वर्षाला शेकडो चित्रपट तयार करत असते. बॉलिवूडप्रमाणे साऊथमध्ये ही तयार होणाऱ्या चित्रपट ही पुरुष प्रधान असतात. तसेच अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींना मिळणारे मानधन ही कमी असते. अभिनेत्यांत्या तुलनेत अभिनेत्री मिळाणारे कमी मानधन कमी का असते याबद्दल अनेक कारण सांगितली जातात. साऊथमध्ये चित्रपटाच्या पटकथेपासून ते मानधनापर्यंत अभिनेत्याच्या तुलनेत अभिनेत्रीला कमी स्क्रीन शेअर करायला मिळते. थोडक्यात काय तर साऊथमध्ये स्त्रीला प्राध्यान देणारे चित्रपट फार कमी तयार होतात आणि त्याचा प्रभाव त्यांच्या मानधनावर पडतो.  साऊथच्या  इंटस्ट्रीत  स्त्री दिग्दर्शिका, निर्मात्या आणि तांत्रिक यांची संख्या कमी आहे. त्यामुळे स्त्री केंद्रीत चित्रपट साऊथमध्ये कमी तयार होतात आणि चित्रपटात अभिनेत्रीपेक्षा अभिनेत्यांना जास्त महत्त्व देण्यात येते. यामुळे सुद्धा त्यांना मानधन कमी देण्यात येते. हे ही त्या मागचे एक कारण असू शकते.  तेलगू चित्रपटातील टॉपची अभिनेत्री नयनतारा आणि अनुष्का शेट्टी यांना एका चित्रपटासाठी 1.5 ते 2 कोटी रुपये दिले जातात. अभिनेत्री काजल अग्रवाल आणि रकुलप्रीत यांना 1 कोटींचे मानधन दिले जाते. याउलट अभिनेता प्रभास, विजय, अजित कुमार यांना एका चित्रपटासाठी 20 ते 30 कोटींचे मानधन दिले जाते.  ALSO RAED : ​प्रभास व श्रद्धा कपूरमध्ये झालाय एक करार! जाणून घ्या काय?प्रभासला 'बाहुबली 2'साठी 25 कोटींचे मानधन देण्यात आले होते. तर अनुष्का शेट्टीला फक्त अडीच कोटीचं देण्यात आले. याचित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमावला होता. बाहुबलीने यशाचे नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले होते. प्रभासच्या बाहुबलीनंतर साहोच्या तयारीला लागला आहे.