Join us  

'डिस्को डान्सर'चा येणार रिमेक, कोण साकारणार मिथुनची भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 2:28 PM

आता या गाजलेल्या सिनेमाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेस्तान या वेबसाईटसोबत बोलताना अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी हा खुलासा केला. 

मुंबई : बॉलिवूडचा डिक्सो डान्सर म्हणून लोकप्रिय असलेला मिथुन चक्रवर्ती याच्या करिअरला कलाटणी देणारा सिनेमा म्हणजे 'डिस्को डान्सर'. आता या गाजलेल्या सिनेमाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेस्तान या वेबसाईटसोबत बोलताना अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी हा खुलासा केला. 

मिथुन चक्रवर्तीचं डिस्को डान्सर सिनेमातील गाणं आजही गल्लोगल्ली ऐकायला मिळतं. या सिनेमाने खऱ्या अर्थाने बॉलिवूडला डिस्को डान्सर मिळाला. आजही हा सिनेमा आवडीने पाहिला जातोय. आता सिनेमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्टी आहे कारण या सिनेमाचाही रिमेक येणार आहे. 

मिथुन चक्रवर्तीच्या डिस्को डान्सरचं दिग्दर्शन बी सुभाष यांनी केलं होतं. महत्वाची बाब म्हणजे डिस्को डान्सरच्या रिमेकचं दिग्दर्शन तेच करणार आहेत. मिलिंद गुणाजी यात व्हिलन साकारणार आहेत. डिस्को डान्सरमध्ये ओम पुरी यांनी व्हिलेन साकारला होता. 

डिस्को डान्सरची कथाही तिच असणार आहे. पण या सिनेमात मिथुनने साकारलेली भूमिका कोण साकारणार हे मात्र अजून नक्की झालं नाहीये. या सिनेमात बी सुभाष हे एक नवा चेहरा घेणार असल्याचेही बोलले जात आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या सिनेमाचं संगीतही आधीच्या सिनेमाप्रमाणे संगीतकार बप्पी लहरी करणार आहेत. 

टॅग्स :बॉलिवूडमिथुन चक्रवर्तीसेलिब्रिटीमिलिंद गुणाजी