Join us

‘थलैवा’ सोबत कोण घेईल ‘पंगा’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 11:54 IST

‘बी टाऊन’च्या दिग्दर्शकांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तारखांबद्दल नेहमीच वाद असतो. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आता बरेच चित्रपट असे आहेत की जे ...

‘बी टाऊन’च्या दिग्दर्शकांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तारखांबद्दल नेहमीच वाद असतो. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आता बरेच चित्रपट असे आहेत की जे रिलीज होणार आहेत. त्यात राकेश रोशन यांचा ‘क्रिश ४’ किंवा शाहरूख खान आणि आनंद एल.राय यांचा नवा चित्रपट हे देखील रांगेत आहेत.यापैकी एका दिग्दर्शकाने संघर्ष टाळण्यासाठी त्यांच्या तारखाच बदलून घेतल्या आहेत. बरं, आता हे तर झालं इतर चित्रपट आणि दिग्दर्शकांबद्दल. पण रिलीजच्या रांगेत यावेळी रोहित शेट्टीचा ‘गोलमाल ४’ आणि रजनीकांत-अक्षय कुमारचा ‘२.०’ हे चित्रपटही आहेत.मात्र, आता रोहितची चांगलीच गोची झालीय. ती अशी की, तो थलैवाचा खुप मोठा फॅन आहे. त्याला थलैवासोबत बॉक्स आॅफिसवर कुठल्याच प्रकारचा संघर्ष नकोय. बरं, तर पाहूयात मग सुपरस्टार जिंकतो की त्याचा फॅन?