Join us

तैमूरच्या बर्थ डे पार्टीत कोणकोण येणार.. सैफ अली खान आणि करिना कपूर खानची यादी तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 15:55 IST

करिना कपूर खान आणि सैफ अली खान सध्या आपल्या मुलाच्या म्हणजेच तैमूर अली खानच्या पहिल्या वाढदिवसाच्या तयारीला लागले आहेत. ...

करिना कपूर खान आणि सैफ अली खान सध्या आपल्या मुलाच्या म्हणजेच तैमूर अली खानच्या पहिल्या वाढदिवसाच्या तयारीला लागले आहेत. त्याचा पहिला बर्थ डे अविस्मरणीय बनवण्यासाठी ते दोघे मोठी प्लॅनिंग करताना दिसता येत. बर्थ डे पार्टीमध्ये काही खास पाहुणे सुद्धा हजेरी लावण्याची शक्यता आहे.तैमुरचा जन्म २० डिसेंबर २०१६ मध्ये झाला. तैमूरचा पहिला बर्थ डे खूप खास असणार आहे. करण जोहरने आपल्या जुळ्या मुलांना आतापर्यंत मीडियासमोर आणले नाही पण तैमूरच्या बर्थ डे पार्टीला तो त्यांना घेऊन जाणार आहे असे तो  नुकत्याच झालेल्या नेहा धुपियाच्या शोमध्ये बोलला.त्याच बरोबर तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यसुद्धा या पार्टीचा हिस्सा बनणार आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की  सोहा नुकतीच एक मुलीची आई झाली आहे त्यामुळे तिची मुलगी ही सहाजिकच येणार. या सगळ्या गोष्टी बघता हे मात्र नक्की तैमूरची बर्थ डे पार्टी बच्चा कंपनीने भरणार आहे.तैमूरच्या पहिल्या दिवाळीसाठी ही करिना कपूरने खास प्लॅनिंग केले आहे. करिनानेच याविषयीचा खुलासा केला आहे. तिने म्हटले की ‘तैमूरची ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे यंदा मी त्याच्यासाठी गिफ्ट आणि मिठाई आणण्याबरोबरच त्याला एक सुंदरसा ट्रेडिशनल आउटफिट घालणार आहे. त्याला गोड खायला खूप आवडते. त्यामुळे मला खात्री आहे की, तो यंदाच्या दिवाळीत मिठाईची चांगलीच चव घेणार आहे. करिनाने म्हटले की, ‘माझ्यासाठी काम प्राथमिकता आहे, परंतु त्याचबरोबर परिवाराची काळजी अन् देखभालही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे मी आणि सैफ दिवाळीअगोदरच आमचे काम आटोपून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. जेणेकरून आम्हाला त्याकाळात तैमूरला पूर्ण वेळ देता येईल. ALSO READ :  पापा सैफ अली खानने केला खुलासा, ‘हे पदार्थ आवडतात तैमूरला’!तसेच करिना तैमूरच्या जन्मांतर वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटींग सुरु केली आहे. वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात करिना कपूरशिवाय सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यादेखील प्रमुख भूमिकेत आहेत. शशांक घोष हा या चित्रपटाचे दिग्दर्शित करतो आहे.