Join us  

कोण आहे ड्रग्स केसमध्ये नाव आलेली सिमोन खंबाटा? जी आहे NCB च्या रडारवर...

By अमित इंगोले | Published: September 25, 2020 9:34 AM

सिमोन खंबाटा ही रिया चक्रवर्तीची मैत्रीण आहे. तिचं नाव रियाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून समोर आलं होतं. पण ही सिमोन खंबाटा आहे तरी कोण हे अनेकांना माहीत नाही.

सुशांत सिंह राजपूतच्या अचानक झालेल्या मृत्युने जेवढा मोठा धक्का इंडस्ट्रीला बसला तसाच धक्का त्याच्या जगभरातील फॅन्सनाही बसला. तेवढाच मोठा धक्का ड्रग्स केसमध्ये बॉलिवूडमधील मोठ्या स्टार्सची नावे समोर आल्यावर अनेकांना बसला आहे. आतापर्यंत सुशांतशी संबंधित ड्रग केसमध्ये रिया चक्रवर्तीपासून ते दीपिका पादुकोण, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नावे आली आहेत. या सर्वांसोबत आणखी एक नाव आहे जे सतत समोर येतंय. ते म्हणजे सिमोन खंबाटा.

सिमोन खंबाटा ही रिया चक्रवर्तीची मैत्रीण आहे. तिचं नाव रियाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून समोर आलं होतं. पण ही सिमोन खंबाटा आहे तरी कोण हे अनेकांना माहीत नाही. आज आम्ही तिचीच माहिती तुम्हाला सांगणार आहोत. सिमोन खंबाटा ही एक फॅशन ब्लॉगर आणि सोशल मीडिया पर्सनॅलिटी आहे. ती तिच्या Mama Says या यूट्यूब चॅनलसाठीही ओळखली जाते.

या चॅनलवर सिमोन तिच्या मुलासोबत दिसते. या चॅनलच्या माध्यमातून सिमोन ती पॅरेंटींगबाब सल्ला, एक्सपर्ट स्लाग, मुलांचा सांभाळ, त्यांचं आरोग्य, लाइफस्टाईल आणि न्यूट्रिशनसंबंधी माहिती देत असते. असे सांगितले जाते की, सिमोन ही बॉलिवूड अभिनेत रणवीर सिंहची देखील चांगली मैत्रीण आहे.

सिमोन खंबाटाचा जन्म दुबईमध्ये झाला आणि ती तिथेच वाढली. तिने तिचा बॉयफ्रेन्ड करण पंथाकेसोबत लग्न केलं. सिमोनला दोन मुलं आहे. मुलगी सेरेना आणि मुलगा जेफर. जेव्हापासून सिमोनचं नाव ड्रग्स केसमध्ये आलं तेव्हापासून तिने तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट केलंय.  

सुशांत सिंह राजपूत आणि ड्रग्स केसमध्ये दीपिका पादुकोण, सिमोन खंबाटा आणि रकुलप्रीत सिंह यांची चौकशी केली जाईल. या सर्वांची नावे जया साहाने सांगितली होती. जयानेच दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशचं नाव सांगितलं होतं. एनसीबी सिमोनला समन्स पाठवण्याच्या तयारीत आहे.

१६/२० केसमध्ये श्रद्धा कपूर आणि सारा अली खान आहे. या दोघींना एनसीबीने समन्स पाठवला आहे. दोघींची चौकशी होणार. या दोघींची नावे रिया चक्रवर्ती आणि काही ड्रग्स पेडलर्सने सांगतिली होती. सारा अली खान नुकतीच गोव्याहून मुंबईला परतली आहे.

एनसीबीच्या रडारवर सध्या ५० बॉलिवूड सेलिब्रिटी आहे. असे सांगितले जात आहे की, धर्मा प्रॉडक्शनचा दिग्दर्शक क्षितिज प्रसाद यालाही एनसीबीने १६/२० केसमध्ये समन्स पाठवला आहे. क्षितिजची शुक्रवारी चौकशी केली जाणार आहे. 

हे पण वाचा :

रिया चक्रवर्तीने NCBच्या चौकशीत नाही घेतले कोणत्याच बॉलिवूड सेलिब्रेटीचे नाव, सतीश मानशिंदेंचा दावा

गोव्याहून मुंबईकडे दीपिका झाली रवाना, तिच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा

धर्मा प्रॉडक्शनपर्यंत पोहोचला ड्रग्ज प्रकरणाचा तपास; या डायरेक्टरला बजावला समन्स

टॅग्स :रिया चक्रवर्तीबॉलिवूडअमली पदार्थसुशांत सिंग रजपूत