Join us

​कोण आहे करण जोहरचा ‘व्हॅलेन्टाईन’? करणने स्वत:च केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 12:42 IST

‘व्हॅलेन्टाईन वीक’ सुरु झालायं आणि तरूणाई सध्या हा वीक साजरा करण्यात मस्त आहे. सोशल मीडियावर ‘सम वन स्पेशल’ टॅग ...

‘व्हॅलेन्टाईन वीक’ सुरु झालायं आणि तरूणाई सध्या हा वीक साजरा करण्यात मस्त आहे. सोशल मीडियावर ‘सम वन स्पेशल’ टॅग जोरात आहे. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने प्रेम व्यक्त करतोय. आता अशात बॉलिवूड कुठे मागे राहतेय? पडद्यावर प्रेम पेरणारा दिग्दर्शक करण जोहर यानेही आपल्या प्रेमाची कबुली दिलीय. होय, करणचा व्हॅलेन्टाईन कोण? याचा खुलासा झालायं.सध्या करण ‘इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत आहे. याच शोची एक कंटेस्टंट नताशाने आपल्या आईला व्हॅलेन्टाईन डे प्रपोज केले. यानंतर  तुझी व्हॅलेन्टाईन कोण? असा प्रश्न करणला विचारण्यात आला. करण या प्रश्नाचे उत्तर चतुराईने टाळणार, अशी अपेक्षा असतानाच करणने मात्र या प्रश्नाचे उत्तर देत सगळ्यांनाच  क्लीन बोल्ड केले. होय, माझ्या आयुष्यात केवळ एकच व्यक्ती आहे, जिच्यावर मी जिवापाड प्रेम करतो. ती व्यक्ती म्हणजे माझी आई. तीच माझी व्हॅलेन्टाईन आहे. या संपूर्ण जगात ती एकटी अशी व्यक्ती आहे, जिच्यासोबत मी माझे संपूर्ण आयुष्य घालवू इच्छितो, असे करण यावेळी म्हणाला. करणच्या या उत्तराने सगळ्यांचे मन जिंकले नसेल तर नवल.करण जोहर सिंगल पॅरेन्ट आहे. सरोगसीच्या माध्यमातून त्याच्या दोन जुळ्या मुलांचा यश व रूहीचा जन्म झालाय. काल ७ फेबु्रवारीला त्याच्या दोन्ही मुलांचा पहिला वाढदिवस साजरा झाला.ALSO READ : करण जोहरने इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्समध्ये दिली ही कबुली करण जोहर ‘गे’असल्याबद्दल मवाळ चर्चा होते. ‘द अनस्युटेबल बॉय’या आपल्या आत्मचरित्रात करणने याबद्दलचे अनेक खुलासे केले आहेत.  ‘मी कोण आहे, यावर मला  काहीही बोलायचं नाही. माझा जन्म सेक्स आयुष्यावर चर्चा करण्यासाठी झाला नाही.अनेक लोक माझ्या सेक्स लाईफबद्धल माहिती मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण, याविषयी मला काही ओरडून सांगणे गरजेचे नाही. मी अशा देशात राहतो, जेथे मी काही गोष्टी सांगितल्यास मला तुरुंगात जावे लागू शकते. मी २६ वर्षांचा असताना व्हर्जिनिटी गमाविली. हे सांगताना मला अभिमान वाटत नाही. मी तेव्हा न्यूयॉर्कमध्ये होतो, माझा तो पहिला अनुभव होता’, असे त्याने यात लिहिले आहे.