Join us

​सोनाक्षीसोबत ‘पंगा’ घेणारी ही कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 16:56 IST

‘अकिरा’चे ट्रेलर रिलीज झाले आणि यातील सोनाक्षी सिन्हाचा तोडफोड अ‍ॅक्शन अवतार बघून सगळेच अवाक् झाले. ट्रेलर पाहणाºया प्रत्येकाने ‘अकिरा’तील सोनाक्षीची तारीफ केली. या ट्रेलरमध्ये सोनाक्षीसोबत पंगा घेणारा एक चेहराही दिसला.

‘अकिरा’चे ट्रेलर रिलीज झाले आणि यातील सोनाक्षी सिन्हाचा तोडफोड अ‍ॅक्शन अवतार बघून सगळेच अवाक् झाले. ट्रेलर पाहणाºया प्रत्येकाने ‘अकिरा’तील सोनाक्षीची तारीफ केली. या ट्रेलरमध्ये सोनाक्षीसोबत पंगा घेणारा एक चेहराही दिसला. हा चेहरा म्हणजे टीना सिंह हिचा. सोनाक्षीसोबत पंगा घेणारी टीना सिंह म्हणजे जाहिरात क्षेत्रातील एक परिचित चेहरा आहे. मोठ्या पडद्यावर सोनाक्षीशी पंगा घेतानाचा अनुभव  कसा होता, असे विचारल्यावर टीना खळखळून हसते. ‘ मला खरचं मज्जा आली. तू सोनाक्षीसोबत चांगलाच पंगा घेतला, असे ट्रेलर पाहून मला अनेकजण म्हणाले. तेव्हा मला फारच गंमत वाटली. सोनाक्षी बॉलिवूडमधील एक चांगली व्यक्ति आहे, एवढेच मी सांगेल. खासगी आयुष्यात ती अतिशय प्रेमळ आहे. सेटवर तिने मला अजिबात दडपण येऊ दिले नाही, हे सांगायलाही ती विसरली नाही.