Join us

दीपिकासोबत कोण आहे ही चिमुरडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 10:54 IST

 दीपिका पादुकोण ही नुकत्याच एका जाहीरातीसाठीच्या फोटोशूटदरम्यान तिच्या एका छोट्या चाहतीसोबत भेटली. ही चिमुरडी लहानपणीच्या दीपिकाची भूमिका या जाहीरातीत ...

 दीपिका पादुकोण ही नुकत्याच एका जाहीरातीसाठीच्या फोटोशूटदरम्यान तिच्या एका छोट्या चाहतीसोबत भेटली. ही चिमुरडी लहानपणीच्या दीपिकाची भूमिका या जाहीरातीत करत आहे.या चाईल्ड मॉडेलचे नाव ध्यान मदन आहे. या दोघीही एकमेकांसोबत किती सुंदर दिसत आहेत ना? दीपिकाने काळ्या रंगाच्या ड्रेसवर केसांचा एक ‘बन’ बांधला आहे. आपल्याला तर माहितीच आहे की,‘दीपिकाला लहान मुलं किती आवडतात ते. दीपिका जेव्हा तिला भेटली तेव्हा तिने तिला गिफ्टस, पुष्पगुच्छ दिला आणि तिच्यासोबत खुप गप्पा मारल्या.हा फोटो म्हणजे त्याचा पुरावाच म्हणावा लागेल. सध्या दीपिका हॉलीवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ चित्रपटाच्या रिलीज होण्याची वाट पाहत आहे. तसेच ती संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ साठी शूटींग सुरू केली आहे.