Join us

कसली बॉबी डार्लिंग? ती तर पहलवान! सासूचा भलताच आरोप!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 13:31 IST

बॉलिवूड फेम बॉबी डार्लिंग उर्फ पंकज शर्मा उर्फ पाखी आणि तिचा पती रमणीक शर्मा यांच्यातील हायप्रोफाईल आरोप-प्रत्यारोप गाजत असताना ...

बॉलिवूड फेम बॉबी डार्लिंग उर्फ पंकज शर्मा उर्फ पाखी आणि तिचा पती रमणीक शर्मा यांच्यातील हायप्रोफाईल आरोप-प्रत्यारोप गाजत असताना आता बॉबीची सासू राजकुमारी शर्मा यांनीही या वादात उडी घेतली आहे. ८२ वर्षांच्या राजकुमारी आजारपणामुळे चालू-फिरू शकत नाहीत. मुलगा व सूनेपासून त्या एकट्या वेगळ्या राहतात.प्लास्टिकची बॉबी नात्यांचे बंधन काय समजणार? ती महिला आहे, असे मला तिच्या वागण्यावरून कधीच वाटले नाही. ती महिला नसून एक पहलवान आहे. एक, हट्टाकट्टा पहेलवान, असे राजकुमारी यांनी म्हटले आहे. बॉबी केवळ लोभी नाही तर वाया गेलेले अपत्य आहे. माझ्या मुलाने संपूर्ण कुटुंबाचा विरोध पत्करून तिला महिलेचा दर्जा दिला. पण बॉबी या नात्याला समजू शकली नाही. कुटुंब काय असते, ते ती समजूच शकत नाही. जी पतीची होऊ शकली नाही, ती अन्य कुणाची कशी होणार. तिला केवळ ग्लॅमर आवडतं. बनावट शरिर घेऊन तिला लाईमलाईटमध्ये राहायचेय. मी तिचा छळ करते, असा आरोप तिने केलाय. त्या पहलवान बाईचा मी काय छळ करणार? मी नाही तर तिनेच माझा छळ केला. ती रोज मला शिव्याशाप द्यायची.केवळ मुलाकडे पाहून मी शांत बसायचे. आत्ताही मी शांतच आहे, असेही राजकुमारी म्हणाल्या.ALSO READ : SHOCKING ! बॉबी डार्लिंगने पतीविरूद्ध दाखल केली तक्रार! वाचा; बॉबीची धक्कादायक आपबीती!!विशेष म्हणजे, सासूच्या या आरोपावर बॉबीनेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘शेरनी चलती है, कुत्ते भौंकते है,’असे ती म्हणाली. रमणीक रोज आपल्या आईला मारतो. बिचारी म्हातारी. मला राजकुमारी शर्मा सारख्या म्हातारीची किव येते. यापेक्षा मी अधिक काहीही बोलणार नाही,असेही बॉबीने म्हटलेय.बॉबी डार्लिंगने फेब्रुवारी २०१६ मध्ये भोपाळमधील रमणीक शर्मा या व्यावसायिकाशी लग्न केले होते. बॉबीने लग्नानंतर आपले नाव बदलून पाखी शर्मा असे ठेवले होते.  पण आता बॉबीने रमणीकविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रमणीक मला दारु पिऊन मारझोड करायचा. परपुरुषासोबत माझे अनैतिक संबध असल्याचे खोटे आरोप करायचा. माझी प्रॉपर्टी आणि पैसे बळकावल्यानंतर त्याला माझ्या मुंबईतील घरावरही त्याला हक्क हवा होता, असे बॉबीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.