सत्यजीत रे हे विद्याचे पहिले क्रश होते. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत देखील तिने त्यांच्याविषयी सांगितले होते. सत्यजीत रे यांना तिने एक पत्र लिहिले होते. त्या पत्राचा उल्लेख तिने या मुलाखतीत केला होता. तिने सांगितले होते की, मी १२-१३ वर्षांची असताना सगळ्यात पहिल्यांदा सत्यजीत रे यांचे लेखन वाचले होते. खरे तर तोपर्यंत त्यांचा एकही चित्रपट मी पाहिलेला नव्हता. पण ते लेखन वाचल्यापासूनच त्यांच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा होती. ते रुग्णालयात असताना त्यांना ऑस्करकडून लाइफ टाइम अॅचिव्हमेंट पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळी ते टिव्हीवर दाखवण्यात आले होते. हा पुरस्कार स्वीकारताना सत्यजीत रे प्रचंड अशक्त दिसत होते. त्यांची अवस्था मला पाहावत नव्हती. त्यामुळे गेट वेल सूनचा आशय असलेले एक पत्र मी त्यांच्यासाठी खास लिहिले होते. मी त्याच्यात लिहिले होते की, तुम्हाला अजून खूप सारे चित्रपट बनवायचे आहेत आणि तुम्हाला माझ्यासाठी देखील चित्रपट बनवायचा आहे. पण मी त्यांना पत्र पोस्ट करण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे माझे हे पत्र कायम माझ्याकडेच राहिले. ते पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यांच्यापर्यंत ते पत्र पोहोचावे ही माझी इच्छा अपुरीच राहिली.
Also Read : विद्या बालनने म्हटले, ‘विवाहित अभिनेत्री हिट चित्रपट देऊ शकत नाहीत’!