Join us  

"ते मंगळावरुन आलेत", भाजपाचं समर्थन करताना कंगनाचं राहुल-प्रियंका गांधींवर टिकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 9:30 AM

कंगना रणौतने राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यावर टिका केलीय. घराणेशाहीचा उल्लेख करत कंगना काय म्हणाली बघा.

कंगना रणौतला हिमाचलमधील मंडी भागातून भाजपातर्फे उमेदवारी मिळाली आहे. कंगना यानिमित्ताने पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात पाऊल ठेवत आहे. कंगनाही उत्सुक आहे. यानिमित्ताने एका मुलाखतीत कंगनाने कॉंग्रेसवर टिका केली आहे. याशिवाय राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या भावंडांवर सुद्धा नाराजी व्यक्त केलीय. कंगना तिचं स्पष्ट मत मांडताना काय म्हणाली? बघा

कंगना रणौत काँग्रेसवर निशाणा साधत म्हणाली, "काँग्रेस हा माझ्यासाठी नेहमीच भीतीदायक पक्ष राहिला आहे. पक्षातील घराणेशाही माझ्यासाठी एक मोठी समस्या आहे. कारण माझ्या चित्रपट उद्योगात मी याच घराणेशाही व्यवस्थेचे लक्ष्य होते. मी उघडपणे त्याचा निषेध केला होता, त्याविरोधात लढा दिला होता. या गोष्टींमुळे नकळत माझे शोषण झाले... घराणेशाही, गटबाजी करणाऱ्या या पक्षाचा मला तिरस्कार आहे."

जेव्हा कंगना रणौतला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या भावंडांचे एका ओळीत वर्णन करण्यास सांगितले गेले तेव्हा कंगनाने दोघांचेही वर्णन 'नेपो किड्स' असे केले. ती म्हणाली, "जणू काही ही भावंडं मंगळावरुन आली आहेत अशी विचित्र आहेत.' पुढे भाजपाबद्दल कंगना रणौत म्हणाली की, "तिने भाजपला मनापासून पाठिंबा दिला आहे. मी पक्षाची सदस्य असो वा नसो, मी नेहमीच पक्षाच्या हितासाठी लढले आहे. मी कोणतीही कसर सोडलेली नाही. मला नेहमीच असे वाटते की माझी विचारसरणी या सरकारशी संबंधित  आहे."

टॅग्स :कंगना राणौतराहुल गांधीप्रियंका गांधीकाँग्रेस