‘मॅन्स वर्ल्ड’ नावाच्या या मासिकाने मार्च २०१८ चा अंक लॉन्च करताना लिहिले की, ‘आजारपणाची दु:खद बातमी शेअर करण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच इरफान खानने जवळपास अर्धा दिवस आमच्यासोबत व्यतीत केला. मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये फोटोग्राफी सेशन झाले होते. त्यावेळी तो पूर्णपणे स्वस्थ दिसत होता.’ पुढे मॅगझिनने लिहिले की, आजारपणाविषयी खुलासा करण्याअगोदर इरफानचे फोटो मॅगझिनवर छापण्यात आले होते. या आजारपणातून त्याने एखाद्या फायटरप्रमाणे पुढे यावे याच आमच्या शुभेच्छा’
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इरफानने ट्विटरवर खुलासा केला होता की, तो एका भयंकर आजाराशी लढा देत आहे. वास्तविक आतापर्यंत त्याच्या आजारपणाबद्दलचा कुठलाही खुलासा समोर आलेला नाही. त्यामुळे सध्या सर्वत्र अफवा पसरविल्या जात आहेत. वाढत्या अफवा बघून इरफानची पत्नी सुतपा सिकदरने एक पोस्टच्या माध्यमातून लोकांना अफवा न पसरविण्याची विनंती केली आहे. फेसबुकवरील एका लांबलचक पोस्टमध्ये सुतपाने लिहिले की, ‘इरफानला काय झाले हे जाणून घेण्यासाठी तुमच्यातील अनमोल ऊर्जा उगाचच वाया घालवू नका. माझा सर्वात चांगला मित्र आणि जोडीदार एक यौद्धा आहे. तो जबरदस्त अंदाजात या संकटाचा सामना करीत आहे. तुमच्या संदेशाचे अन् कॉलचे उत्तर न दिल्याबद्दल मी माफी मागते. परंतु मी जगभरातून इरफानच्या दीर्घायुष्यासाठी केली जात असलेली प्रार्थना, चिंता आणि शुभेच्छासाठी कायम ऋणी राहणार आहे.
नॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला अभिनेता इरफान खानचा ‘ब्लॅकमेल’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात दिव्या दत्ता, अरुणोदय सिंग, ओमी वैद्य, प्रद्युम्न सिंग आणि गजराज राव बघावयास मिळणार आहेत. हा चित्रपट १६ एप्रिल रोजी प्रदर्शित होईल.