शाहरुख खानचा (Shahrukh Khan) ‘स्वदेश’ (Swades) हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. या चित्रपटातील एक मराठमोळा चेहराही प्रेक्षक विसरले नसावेत. होय, आम्ही बोलतोय ते गायत्री जोशी (Gayatri Joshi) हिच्याबद्दल. या चित्रपटात शाहरुख खान, गायत्री जोशी यांच्या मुख्य भूमिका होत्या. ‘स्वदेश’ गायत्रीचा हा पहिलाच चित्रपट होता. ‘स्वदेश’नंतर गायत्री एका रात्रीत स्टार झाली. यानंतर ती कोणत्या सिनेमात झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. पण या चित्रपटानंतर गायत्रीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. गायत्रीने पहिल्याच चित्रपटानंतर बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.
‘स्वदेश’ चित्रपटातील गायत्रीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले. पहिल्याच चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्काराही तिच्या पदरात पडले. यानंतर गायत्रीच्या नव्या सिनेमाची प्रतीक्षा होती. पण गायत्रीने सिनेमाला रामराम ठोकत संसार थाटला.‘स्वदेश’ प्रदर्शित झाल्यानंतर काहीच वर्षांत तिने विकास ओबेरॉय या व्यवसायिकासोबत लग्न केले. आज ती बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर असून परदेशात आपल्या कुटुंबियांसोबत राहाते. गायत्री आणि विकास यांना दोन मुले असून ती जास्तीत जास्त वेळ मुलांना देते. विकासकडे दहा हजार करोडोहून अधिक संपत्ती असल्याचे म्हटले जाते.
गायत्री आज चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी बॉलिवूडमधील अनेकांसोबत तिची खूपच चांगली मैत्री आहे. तिला सोनाली बेंद्रे, अक्षय खन्ना, ट्विंकल खन्ना, हृतिक रोशन, सुजैन खान यांच्यासोबत अनेकवेळा ती दिसते. गायत्रीमध्ये आता खूप बदल झाला असून तिला ओळखणे देखील कठीण जाते.