Join us  

देव आनंदबरोबर काम; दाऊदसोबत अफेअर, पाकिस्तानी अभिनेत्रीवर भारताच्या हेरगिरीचे आरोप, सध्या कुठे आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 2:21 PM

पाकिस्तानी अभिनेत्रीवर भारताची हेरगिरी करण्याचा आरोप लागला होता. कोण आहे ती? सध्या काय करते?

भारतीय मनोोरंजन विश्वात अनेक पाकिस्तानी अभिनेत्रींनी सिनेमात काम करुन लोकप्रियता मिळवली. सध्या पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची बंदी असली तरीही पाकिस्तानी कलाकारांच्या कलेवर भारतीयांनीही प्रेम केलं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका पाकिस्तानी अभिनेत्रीची कहाणी सांगणार आहोत. जिने दिग्गज अभिनेते देवानंद यांच्यासोबत काम केलं. पण पुढे तिच्यावर पाकिस्तानासाठी (Pakistan) जाऊन भारताची हेरगिरी केल्याचे आरोप लागले. या अभिनेत्रीचं नाव अनीता अयुब. करिअरच्या शिखरावर असताना अनिता सध्या कुठे असते?

अनिता ही पाकिस्तानातली सुप्रसिद्ध मॉडेल. तिने कराचीमधून मॉडेलिंगच्या माध्यमातून करिअरची सुरुवात केली. पुढे मुंबईत येऊन रोहन तनेजा यांच्याकडून तिने अभिनयाचे धडे गिरवले. 'गर्दिश' आणि 'हसीना-ए-आलम' या तिच्या पाकिस्तानी मालिका चांगल्याच लोकप्रिय ठरल्या.  अनीताने देव आनंद (Dev Anand) यांच्या 'प्यार का तराना' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा १९९३ साली प्रदर्शित झाला होता. पुढे मिडीया रिपोर्टनुसार अनीताचं दाऊदसोबत (Dawood Ibrahim) अफेअर असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या. 

असंही मानलंं जातं की, फिल्ममेकर जावेद सिद्दीकीने अनीताला सिनेमात घेण्यास नकार दिल्याने दाऊदच्या टोळीने त्यांची हत्या केली. पुढे अनितावर पाकिस्तानसाठी भारताची हेरगिरी केल्याचे आरोप लागले. फिल्म मॅगझिन 'फॅशन सेंट्रल'ने या चर्चांना पुष्टी दिली.  यामुळे बॉलिवूडने अनिताला बॉयकॉट केलं आणि तिला पुन्हा पाकिस्तानात जावं लागलं. अनिताने भारतीय व्यावसायिक सौमिल पटेल सोबत लग्न केलं. तिला आणि सौमिलला शेजर हा मुलगा आहे. परंतु पुढे त्यांचा घटस्फोट झाला. सध्या अनिता पाकिस्तानी व्यावसायिक सुबक मजीससोबत लग्न करुन परदेशात स्थायिक आहे.

 

टॅग्स :पाकिस्तानबॉलिवूडदेव आनंददाऊद इब्राहिम