Join us

‘तुम कहां हो?’ ‘मैं हमेशा तुम्हारे साथ हूं ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 21:36 IST

बॉलिवूड स्टार सुशांत सिंग राजपूत आणि त्याची गर्लफ्रेंड(?) अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपच्या  बातम्यांमुळे सगळेच हैरान आहेत. दोघांनीही ब्रेकअपच्या बातमीला ...

बॉलिवूड स्टार सुशांत सिंग राजपूत आणि त्याची गर्लफ्रेंड(?) अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपच्या  बातम्यांमुळे सगळेच हैरान आहेत. दोघांनीही ब्रेकअपच्या बातमीला अधिकृत दुजोरा दिला नाही. तरिही सुशांत व अंकिताच्या चाहत्यांना या बातमीने धक्का बसला आहे. सगळे काही ठीक असताना अचानक या गोड कपलमध्ये दुरावा का? याचा विचार करून दोघांच्याही चाहत्यांच्या डोक्याचा पार भुगा झाला आहे. गेल्या सहा वर्षांपासून हे जोडपे एकमेकांच्या प्रेमात होते आणि काही वर्षांपासून सोबत राहत होते. मात्र असे असताना अचानक दोघांच्याही ब्रेकअपची बातमी आली. आता ही अफवा आहे की, आणखी काही, हे सुशांत आणि अंकिता दोघेच जाणोत. कारण एकीकडे ब्रेकअपची बातमी असताना अंकिताच्या ताज्या टिष्ट्वटने या प्रकरणातील सस्पेन्स आणखी वाढवला आहे.‘तन्हा महसूस ना करो, मै हमेशा तुम्हारे दिल में हूं, तुम्हारी जिंदगी में हूं’असे टिष्ट्वट अंकिताने केले आहे.तिच्या आधी सुशांतने ‘भीड मे तन्हा हूं, तुम कहां हो??’ असे टिष्ट्वट केले होते. 

Alone in the crowd..!! Where are you ..? pic.twitter.com/A5qdM1GTIa— Sushant S Rajput (@itsSSR).....................................​सुशांत-अंकिताचे ब्रेकअप?सध्या मीडियात बॉलिवूड ब्रेकअपच्या बातम्यांचे चर्वितचर्वण सुरु आहे. रणबीर-कतरिना, फरहान-अधुना यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या आल्या. आता यात आणखी एका जोडप्याचे नाव जोडले गेलेयं. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे या ‘बिनधास्त’ जोडप्याचे ब्रेकअप झाल्याची खबर आहे. गेल्या काही वर्षांपासून ते लिव्ह इन मध्ये होते. मात्र आता सहा वर्षांचे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय दोघांनीही घेतला आहे. सुशांतने अंकितासोबत राहत असलेले घर सोडले असून एका पंचतारांकित हॉटेलात मुक्काम हलवला आहे.अलीकडे सुशांतच्या वाढदिवसालाही अंकिता नव्हती, हे बघून अनेकांना दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची शंका आली होती. आता खरे काय नि खोटे काय, हे अंकिता आणि सुशांत हे दोघेच जाणोत.