जब मिल बैठें दो ‘शहंशाह’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 16:35 IST
बॉलिवूडचा शहंशाह म्हणजे अमिताभ बच्चन तसेच क्रिकेटमधील ‘शहंशाह’ म्हणजे वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू क्रिस गेल. सोमवारी रात्री क्रिस गेल याने ...
जब मिल बैठें दो ‘शहंशाह’
बॉलिवूडचा शहंशाह म्हणजे अमिताभ बच्चन तसेच क्रिकेटमधील ‘शहंशाह’ म्हणजे वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू क्रिस गेल. सोमवारी रात्री क्रिस गेल याने अमिताभ यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली. या दोन्ही स्टार्सनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. इंस्टाग्रामवर अमिताभ यांच्यासोबतचा फोटो शेअर करीत, गेलने लिहिले, ‘लेजेंड अमिताभ बच्चन, मला घरी येण्याचे आमंत्रण दिल्याबद्दल, माझे आदरातिथ्य केल्याबद्दल आणि मला एक बुक भेट दिल्याबद्दल आभार.’ पुढे गेलने लिहिले, ‘बॉस(अमिताभ)ला वाटते की, मी सेन्चुरी बनवावी पण भारतच जिंकावा. पण मला सेंच्युरी बनवण्यापेक्षा जिंकणेच आवडेल. या महान व्यक्तिमत्त्वास खूप सारे प्रेम आणि आदर. मिस्टर बच्चन, वाईन आणि फूडसाठी धन्यवाद..‘गेलने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला तसाच अमिताभ यसंनी टिष्ट्वटरवरून फोटो शेअर केला. शिवाय त्याखाली लिहिले,‘क्रिस गेल माझे फॅन आहेत, मला ठाऊक नव्हते. ते खूप सभ्य व विनम्र आहेत. येत्या गुरूवारी(सेमीफायनल मॅचच्या दिवशी) माझी कॉम्प्लिमेंट ते ध्यानात ठेवतील, अशी अपेक्षा बाळगतो..’ टी-२० वर्ल्डकपचे दुसरे सेमीफायनल उद्या गुरुवारी होत आहे. भारत विरूद्ध वेस्टइंडिज असा सामना रंगणार आहे................. फेबु्रवारी २०१६ मध्ये गेल यांनी अमिताभ यांना स्पेशल बॅट गिफ्ट केली होती. या भेटीमुळे अमिताभ यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. या बॅटसोबतचा फोटो अमिताभ यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. काय भेट दिलीत, तुम्ही मला ओळखता मला ठाऊक नव्हते. तुमची भेट पाहून मला अतिशय आनंद झाला,असे अमिताभ यांनी लिहिले होते. यावर गेल यानेही रिटिष्ट्वट केले होते. माझी जुनी बॅट दिग्गज अमिताभ यांना भेट देणे माझ्यासाठी गौरवाची बाब आहे.मी त्यांचा मोठा फॅन आहे. भारतात लवकरच त्यांना भेटेल, असे गेलने लिहिले होते.