जेव्हा विमानतळावर अचानकच युवराज सिंग अन् काजोलचा झाला सामना, तेव्हा काहीसे असे घडले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 19:24 IST
अभिनेत्री काजोल युवराजची फेव्हरेट स्टार असून, तिची अचानकच भेट झाल्याने युवराज भलताच खूश आहे. काजोलबरोबरचा एक सेल्फी त्याने सोशल अकाउंटवर शेअर केला आहे.
जेव्हा विमानतळावर अचानकच युवराज सिंग अन् काजोलचा झाला सामना, तेव्हा काहीसे असे घडले!
भारतात कराडो लोक क्रिकेटपटू युवराज सिंग यांचे चाहते आहेत. परंतु युवी अभिनेत्री काजोलचा डाय हार्ड फॅन आहे. आता तुम्ही विचार करा की, जर आपल्या फेव्हरेट स्टार्सची अचानकच भेट होत असेल तर काय अवस्था होईल? अशी अवस्था आपल्या युवीची झाली. होय, युवराजच्या आनंदाला तेव्हा पारावार उरला नव्हता, जेव्हा युवराजचा अचानकच त्याच्या फेव्हरेट स्टारशी आमना-सामना झाला. त्याचे झाले असे की, युवराज सिंग विमानतळावर होता. त्याची फ्लाइट काही तास उशिराने असल्याने तो फ्लाइटची प्रतीक्षा करीत होता. मात्र अचानकच त्याच्या चेहºयावर आनंद फुलला. त्याच्यासमोर अचानकच त्याची फेव्हरेट स्टार काजोल उभी राहिली. काजोलला बघून, युवराज दंग राहिला. दोघांमध्ये बराच वेळ गप्पा गोष्टी रगंल्या. पुढे युवराजने काजोलसोबत एक सेल्फीही काढली. शिवाय सेल्फी त्याने सोशल अकाउंटवर शेअरही केली. त्याच्या कॅप्शनमध्ये युवराजने लिहिले की, ‘जर तुमची फ्लाइट उशिराने असेल आणि याच दरम्यान तुमची तुमच्या फेव्हरेट स्टारशी भेट होत असेल तर तुमचा दिवस आनंदात जाईल यात शंका नाही.’ असो, युवराज सध्या मैदानाबाहेर असून, त्याने लवकरच मैदानावर आपल्या फलंदाजीचा करिष्मा दाखवावा अशीच त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. युवराजला त्याच्या धुवाधार फलंदाजीसाठी ओळखले जाते. त्यामुळे आगामी काळातील भारतीय क्रिकेट संघाची व्यस्त वेळापत्रक बघता युवराजच्या नावाचा निवड समितीला विचार करावा लागणार हे निश्चित. वास्तविक निवड समितीनेच त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. युवराजच्या फिटनेसचा मुद्दा वारंवार उपस्थित होत असल्याने, त्याला हा सल्ला देण्यात आल्याचे सांगितले जाते. परंतु हे खरे कारण नसून, तो एका महत्त्वपूर्ण टेस्टमध्ये पास होऊ शकला नसल्यानेच निवड समितीने त्याला बाहेरचा रस्ता दाखविला आहे. असो, युवराजच्या कारकिर्दीचा विचार केल्यास, त्याने आतापर्यंत बराच संघर्ष केला आहे. जेव्हा-जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा-तेव्हा त्याने स्वत:ला सिद्धही केले आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करून संघात परतेल अशी त्याच्या चाहत्यांना पूर्ण खात्री आहे.