Join us

श्वेता-यामी जेव्हा येतात एकमेकांसमोर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 15:18 IST

पुल्कित सम्राट याचे वैयक्तिक आयुष्य आता ‘बी’ टाऊनच्या चर्चेचा विषय बनला आहे. तसेच श्वेता रोहिरा आणि यामी गौतम यांच्यातील ...

पुल्कित सम्राट याचे वैयक्तिक आयुष्य आता ‘बी’ टाऊनच्या चर्चेचा विषय बनला आहे. तसेच श्वेता रोहिरा आणि यामी गौतम यांच्यातील शीतयद्ध हे नेहमीच चर्चेचा विषय असतो. पण, नुकतेच ‘ढिशूम’ च्या स्क्रिनिंगसाठी श्वेता-यामी दोघी एकमेकांसमोर आल्या.तेव्हा मात्र दोघीही चांगल्याच चपापल्या. चित्रपटाच्या मध्यंतरानंतर श्वेता डेझी शाहच्या बाजूला बसली होती. आणि तिला माहिती नाही की, तिच्या मागेच बसली आहे.श्वेता यामीला बोलण्यासाठी तिथे जाणार होती.पण, स्क्रिनिंगला गर्दी एवढी होती की तिला जाताच आले नाही. त्यांना त्यांचे सीट्सही बदलता आले नाहीत. पुल्कितने घटस्फोट घ्यायचे ठरवल्यापासून ही त्या दोघींची पहिलीच भेट होती.