Join us
Daily Top 2Weekly Top 5

​मिलिंद सोमण चढणार बोहल्यावर, बघा लग्नाच्या तयारीचे Inside Photos !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 17:38 IST

५२ वर्षीय अभिनेता मिलिंद सोमण २७ वर्षीय गर्लफ्रेंड अंकिता कंवरसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. आज २१ एप्रिल रोजी अलिबाग ...

५२ वर्षीय अभिनेता मिलिंद सोमण २७ वर्षीय गर्लफ्रेंड अंकिता कंवरसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. आज २१ एप्रिल रोजी अलिबाग येथे मिलिंद दोघांचे कुटुंबीय आणि निकटवर्तियांच्या उपस्थितीत लग्नाच्या रेशीमगाठीत अडकत असून लग्नाच्या तयारीचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापैकी एका फोटोत अंकिताच्या हातावर मेंदी लागली असून तिने मिलिंदचा एक डोळा बंद केलेला दिसतोय. तर इतर फोटोजमध्ये लग्नस्थळ फुलांनी सजलेले दिसत आहे. शिवाय मिलिंद आणि अंकिताचा रोमँटिक अंदाज, त्यांच्यातील केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर लग्नाच्या तयारीचे फोटो पाहून चाहत्यांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अंकिता मूळची दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे. मागील दीड वर्षांपासून मिलिंद अंकिताला डेट करत होता. मात्र दोन तीन दिवसांपूर्वी लॉटरीच्या पैशांमुळे अंकिता मिलिंदचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले होते. मात्र त्या निव्वळ अफवा असल्याचे समोर आले असून दोघांनीही लग्नबंधनात अडकत असून आपल्या आयुष्याची नवी सुरूवात करत आहेत. मिलिंद सोमणचे हे दुसरे लग्न असून २००६ मध्ये फ्रेंच अभिनेत्री Mylene Jampanoi सोबत लग्न थाटले होते. मात्र लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच दोघांचा घटस्पोट झाला. गेल्या दीड वर्षांपासून मिलिंद मात्र अंकिताला डेट करत आहे. या नात्याने दोघांचेही कुटुंबीय आनंदी आहेत. अंकिता दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे. २०१३ मध्ये तिने एअर एशियात केबिन क्रू केबिन एग्झिक्यूटिव म्हणून नोकरी सुरु केली होती. तिला आसामीशिवाय हिंदी, इंग्रजी, फ्रेंच आणि बंगाली भाषा येते. नोव्हेंबर २०१५ मध्ये अंकिताने मिलिंदसोबत तिचे पहिले मॅरेथॉन पूर्ण केले होते. मिलिंद प्रत्येक पोस्टमध्ये तिचा उल्लेख श्रीमती असा करतो. काही महिन्यांपूर्वीच मिलिंद अंकिताच्या गुवाहाटी येथील घरी गेला होता. अंकिताच्या भाच्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत तो सहभागी झाला होता.याच निमित्ताने मिलिंद अंकिताच्या पालकांना भेटला आणि अंकिताशी लग्न करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला होता.आधी अंकिताचे पालक वयाच्या अंतरावरून या लग्नासाठी राजी नव्हते.पण मिलिंदला प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांनी या लग्नाला होकार दिला होता.