Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृतिक रोशनसोबत अफेअरच्या बातम्यांमुळे भडकली होती करिना कपूर, विवाहित पुरूषांबाबत केलं होतं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 17:58 IST

करिना आणि हृतिक रोशन या जोडीने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल केली होती. त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले. अशात दोघांमध्ये अफेअर सुरू असल्याचीही चर्चा सुरू होती.  

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक ऑनस्क्रीन जोड्या आहेत ज्यांना प्रेक्षकांचा भरपूर प्रेम मिळालं. या यादीत हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि करिना कपूर (Kareena Kapoor) ही जोडीही आहे. करिना आणि हृतिक रोशन या जोडीने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल केली होती. त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले. अशात दोघांमध्ये अफेअर सुरू असल्याचीही चर्चा सुरू होती.  

अनेकदा दावा करण्यात आला होता की,  करिना आणि हृतिक रोशन एकमेकांना डेट करत आहेत. याच कारणाने स्वत:  करिनाने समोर येऊन या अफवांबाबत खुलासा केला होता. यावेळी करिनाने विवाहित पुरूषांबाबत आपलं मत मांडलं होतं आणि सांगितलं होतं की, ती कधीही विवाहित पुरूषाच्या प्रेमात पडणार नाही.

करिनाने एका मुलाखतीत हृतिक रोशनसोबतच्या नात्याबाबत चर्चा केली होती. त्यावेळी अभिनेत्री रागात म्हणाली होती की, आता तिला अशाप्रकारच्या अफवांपासून ब्रेक हवा आहे. करिना म्हणाली होती की, ती कधीही कोणत्याही विवाहित पुरूषाच्या प्रेमात पडलेली नाही आणि ती कधीही विवाहित पुरूषासोबत अफेअर करणार नाही.

करिना असंही म्हणाली होती की, विवाहित पुरूष तिच्या करिअरसाठी हानिकारक आहेत. तिला आणि हृतिकला निर्माते, दिग्दर्शक साइन करतात कारण ते एक हॉट जोडी आहे. त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडते. करिना म्हणाली होती की, तिला चिंता आहे की, या अफवांचा प्रभाव हृतिक आणि सुझेनच्या वैवाहिक जीवनावर होऊ नये.

करिनाच्या या खुलाशानंतर तिच्या आणि हृतिकच्या अफेअरच्य अफवा बंद झाल्या होत्या. त्यानंतर दोघांनी सोबत कामही केलं नाही. दावा केला जातो की, या अफवांमुळेच तिने हृतिकसोबत काम करणं बंद केलं होतं. त्यानंतर  हृतिकचं नाव बारबरा मोरी आणि कंगनासोबत जुळलं होतं. ज्यामुळे हृतिकचं वैवाहिक जीवन संपलं होतं.  

करिना कपूरने या मुलाखतीत भलेही विवाहित पुरूषापासून दूर राहणार असल्याचं सांगितलं होतं. पण अभिनेत्री २०१२ मध्ये सैफ अली खानसोबत लग्न केलं. सैफ अली खानचं आधी अमृता सिंहसोबत लग्न झालं होतं. त्यांचा घटस्फोट झाला होता. आता त्यांना दोन मुलेही आहेत. दोघांच्या वयात १० वर्षांचं अंतर आहे.   

टॅग्स :करिना कपूरहृतिक रोशन