Join us  

कधीकाळी एकता कपूरसोबत लग्न करायला तयार होता करण जोहर, हे होते कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 1:51 PM

बॉलिवूडचा दिग्गज निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि टीव्हीची ‘क्वीन’ एकता कपूर कालपासून जाम चर्चेत आहेत....

ठळक मुद्देकरण जोहर आणि एकता कपूर यांच्यात त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमध्येही एक चांगले बॉन्डिंग आहे.

बॉलिवूडचा दिग्गज निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि टीव्हीची ‘क्वीन’ एकता कपूर कालपासून जाम चर्चेत आहेत. कारण काय, तर काल करणने सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो. होय, करणने आपल्या नव्या लूकमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर एकताने करणला  तिचा सुपरहिट शो ‘कसौटी जिंदगी की’मधील मिस्टर बजाजची भूमिका आॅफर केली होती. अर्थात हा सगळा गमतीचा मामला. पण एकता व करणची मैत्री तशी जुनी आहे. ऐकून आश्चर्य वाटेल पण एकेकाळी बॉलिवूडमध्ये या दोघांच्या लग्नाच्या चर्चाही होत्या. पुढे करण जोहर स्वत: यावर बोलला होता.

‘मला आणि एकताला योग्य जोडीदार मिळाला नाहीच तर आम्ही दोघं एकमेकांशी लग्न करू. आमच्या लग्नामुळे कोणाला आनंद  होवो ना होवो. पण माझ्या आईला मात्र खूप आनंद होईल. कारण आमचे लग्न झालेच तर आईला एकताच्या सीरिअलमध्ये पुढे काय होणार आहे हे सर्वांच्याआधी माहित असेल, असे करण एका मुलाखतीत म्हणाला होता. आता करणने हे सगळे गमतीगमतीत म्हटले होते की सीरिअसली हे ज्याचे त्यानेच ठरवलेले बरे.

करण जोहर आणि एकता कपूर यांच्यात त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमध्येही एक चांगले बॉन्डिंग आहे. दोघंही एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करताना दिसतात. दोघांची चांगली मैत्री आहे़  या दोघांमध्ये अनेक गोष्टी कॉमन आहेत. स्टार किड असण्यापासून तर सरोगेसीद्वारे पालक बनण्यापर्यंतच्या अनेक गोष्टीत दोघांमध्ये समानता आहे. शिवाय दोघेही आपआपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये यशाच्या शिखरावर आहेत.

टॅग्स :करण जोहरएकता कपूर