Join us
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हा मी बिल्कुल घाबरले नाही - वाणी कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 14:34 IST

आदित्य चोप्रा हा सध्याच्या भारतातील सर्वांत बेस्ट दिग्दर्शकांपैकी एक मानला जातो. त्याचे दिग्दर्शन, कथानकातील वेगळेपणा, रोमँटिक कॉमेडी फंडा यामुळे ...

आदित्य चोप्रा हा सध्याच्या भारतातील सर्वांत बेस्ट दिग्दर्शकांपैकी एक मानला जातो. त्याचे दिग्दर्शन, कथानकातील वेगळेपणा, रोमँटिक कॉमेडी फंडा यामुळे तो चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. सध्या त्याच्या ‘बेफिक्रे’ या चित्रपटामुळे तो चर्चेत आहे. रणवीर सिंग आणि वाणी कपूर ही हटके जोडी त्याने या आगामी चित्रपटात घेतली आहे. वाणीचा बॉलिवूडमधील हा खरंतर दुसरा चित्रपट आणि तो ही एवढ्या मोठ्या दिग्दर्शकासोबत. मात्र, आदित्य चोप्रासोबत काम करतानाा तिला कसलीही भीती वाटली नाही, हे तिने नुकतेच स्पष्ट केले आहे. दिग्दर्शक आदित्य चोप्रा२०१३ मध्ये ‘शुद्ध देसी रोमान्स’ मधून वाणी कपूरने बॉलिवूड डेब्यू केला होता. आता ती ‘बेफिक्रे’ मध्ये रणवीर सिंगसोबत पॅरिसमध्ये रोमान्स करताना दिसेल. आदित्य चोप्रासोबत काम करण्याचा तिचा अनुभव शेअर करतानाा ती म्हणते,‘ आदित्य चोप्रासोबत काम करणं फार काही कठीण काम नाही. मी त्यांच्यासोबत कम्फर्टेबल होते. न घाबरता मी त्यांच्याशी बोलत असायचे. मी अनेकदा त्याला एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारायचे. पण, ते मात्र तेवढ्याच संयमाने त्याचे उत्तर देत असत. शूटिंग करत असताना मी कुठलीही काळजी करायचे नाही. माझ्या अभिनयाचं परीक्षण करणारं कुणीही नाही हे मला ठाऊक होतं.’अलीकडे रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांनी फ्रान्समध्ये एका प्रसिद्ध फॅशन ब्रँडसाठी रॅम्पवॉक केला होता. त्यांची जोडी ‘बी टाऊन’ च्या जोड्यांपैकी सर्वांत आवडत्या जोड्यांपैकी एक ठरली आहे. चित्रपटातील गाण्यांना यूट्यूबवर प्रचंड लाईक्स मिळताना दिसत आहेत.