Join us  

Throwback:  डिंपलला राज कपूर-नर्गिसची लेक म्हणू लागले होते लोक, अनेक वर्षानंतर समोर आलं होतं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 5:33 PM

होय, डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) ही नर्गिस व राज कपूर यांची अनौरस संतान असल्याचं त्याकाळी म्हटलं गेलं होतं. आधी नर्गिस व राज कपूर दोघांनीही या अफवेकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर नर्गिस एका मुलाखतीत यावर बोलल्या होत्या...

बॉलिवूडच्या पडद्यावरच्या गाजलेल्या जोड्यांचा उल्लेख होत असताना राज कपूर ( Raj Kapoor)आणि नर्गिस (Nargis ) या जोडीला विसरणं शक्यचं नाही. बरसात, आवारा, श्री 420, चोरी चोरी पासून अंदाजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटात राज कपूरनर्गिसची जोडी दिसली. या जोडीच्या चित्रपटांची चर्चा झाली, तेवढीच त्यांच्या अफेअरची सुद्धा चर्चा झाली. राज कपूर नर्गिसच्या प्रेमाचे अनेक किस्से आजही ऐकवले जातात. खुद्द राज कपूर  हेही प्रत्येक मुलाखतीत  नर्गिसचा उल्लेख करायचे. पुढे नर्गिसनं सुनील दत्त यांच्यासोबत लग्न केलं आणि अफेअरच्या चर्चा कमी झाल्यात. पण 1973 मध्ये ‘बॉबी’ हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर नर्गिस व राज कपूर यांच्याबद्दलची एक वेगळीच अफवा इंडस्ट्रीत पसरली होती.

होय, ‘बॉबी’ची हिरोईन डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) ही नर्गिस व राज कपूर यांची अनौरस संतान असल्याचं त्याकाळी म्हटलं गेलं होतं. आधी नर्गिस व राज कपूर दोघांनीही या अफवेकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर नर्गिस एका मुलाखतीत यावर बोलल्या होत्या.

 राज कपूर यांनी आपल्या मुलाला म्हणजेच ऋषी कपूरला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी ‘बॉबी’ या चित्रपटाची निवड केली आणि या चित्रपटात हिरोईन म्हणून डिंपल यांची वर्णी लागली होती. ‘बॉबी’ प्रदर्शित झाला आणि या चित्रपटानं कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले. डिंपल नावाची ही नवी हिरोईन कोण, कुठली हे कळायच्या आधीच चाहते तिच्यासाठी अक्षरश: वेडे झालेत.  

‘बॉबी’चं अपार यश अनुभवत असताना याचकाळात डिंपलबद्दल एक अफवाही पसरली.  डिंपल कपाडिया ही नर्गिस आणि राज कपूर  यांची मुलगी आहे. त्यामुळे राज कपूर यांनी तिला ‘बॉबी’मध्ये लीड रोल दिला, अशी चर्चा का कुणास ठाऊक अचानक सुरू झाली.  डिंपल अगदी नर्गिससारखी दिसते,असंही म्हटलं केलं.  याची इतकी चर्चा झाली की, यामुळे शाळेतील  मुलं बोर्डिंगमध्ये शिकत असलेल्या संजय दत्तला (नर्गिस व सुनील दत्त यांचा मुलगा)टोमणे मारायचे. संजय दत्तला नर्गिस आणि डिंपल यांच्या नावावरुन चिडवायचे. या कारणामुळे संजय आई नर्गिसवर नाराज राहू लागला होता. अर्थात पुढे डिंपलबद्दलची चर्चा निव्वळ अफवा असल्याचं सिद्ध झालं. खुद्द नर्गिस यांनी यावर खुलासा केला.

 एका मुलाखतीत नर्गिस यावर बोलल्या होत्या. ‘या अफवा कशा उठल्या याबद्दल मला ठाऊक नाही.  ‘बॉबी’तील डिंपलचा लूक माझ्या ‘आवारा’तील लूकशी मिळताजुळता आहे, त्यामुळे या कथा रचण्यात आल्या. अशा अफवा पसरवणं अतिशय मुर्खपणा आहे. देव न करो, पण जर असं घडलं असतं, तर मी माझ्या मुलीला नक्कीच स्वीकारलं असतं. डिंपल अतिशय समजूतदार मुलगी आहे. तिने या अफवा गमतीवर घेतल्या आणि त्याकडे दुर्लक्ष केलं. माझ्या पती आणि मुलांनी याकडे दुर्लक्ष केलं, असं त्या म्हणाल्या होत्या. अशा गॉसिप्सचा ताण घेऊन मला मरायचं नाही, असंही त्या म्हणाल्या होत्या.

टॅग्स :डिम्पल कपाडियानर्गिसराज कपूरबॉलिवूड