Join us  

दीपिका पादुकोण-रणवीर सिंगचा ‘खलीबली’ डान्स तुफान हिट; तुम्ही पाहिलातं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 8:46 PM

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग अलीकडे एका मीडियाच्या इव्हेंटमध्ये दिसले. केवळ दिसलेच नाही तर एकत्र डान्स करून दोघांनीही इंटरनेटच्या दुनियेत जणू आग लावली. 

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग अलीकडे एका मीडियाच्या इव्हेंटमध्ये दिसले. केवळ दिसलेच नाही तर एकत्र डान्स करून दोघांनीही इंटरनेटच्या दुनियेत जणू आग लावली. दीपिकाने रणवीरसोबत सुपरहिट ‘खलीबली’ गाण्यावर ताल धरला आणि सगळेच पाहत राहिले. एचटी लीडरशिप समिटदरम्यानचा दीपिका व रणवीरचा हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

 व्हिडिओत दीपिका अगदी रणवीर स्टाईलमध्ये डान्स करतेय. ‘पद्मावत’ या चित्रपटात दीपिका व रणवीरने एकत्र काम केले होते. दीपिकाने राणी पद्मावतीची भूमिका साकारली होती तर रणवीर अलाऊद्दीन खिल्जीच्या निगेटीव्ह रोलमध्ये दिसला होता. अर्थात या चित्रपटात दोघांचा एकही सीन नव्हता. ‘पद्मावत’ रिलीज होऊन जवळ जवळ १० महिने झाले आहेत. पण अजूनही या चित्रपटाचे वेड कमी झालेले नाही. रणवीर व दीपिकाचा हा व्हिडिओ पाहून तरी हेच दिसतेय.रणवीर व दीपिका लवकरच लग्न करणार, अशी चर्चा आहे. या इव्हेंटमध्ये दीपिका व रणवीरला लग्नाबद्दल विचारले असता, रणवीरने चांगलेच मजेशीर उत्तर दिले. माझ्या लग्नाबद्दल माझ्यापेक्षा लोकचं अधिक उत्सूक असल्याचे मला दिसतेय. मी लग्न करणार, हे मला मीडियातूनचं कळले आहे. मी शेरवानी डिझाईन केली, हेही दुस-यांकडूनचं मला कळले आहे, असे रणवीर म्हणाला.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग