Join us  

किस्सा: रेखासोबत गैरवर्तन करणाऱ्याला बिग बींनी केली होती मारहाण; सेटवर पसरली होती शांतता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 12:03 PM

Amitabh bachchan: कलाविश्वात आजपर्यंत अनेक कलाकारांचे अफेअर्स गाजले. मात्र, यात अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील नातं कायम गूढ राहिलं.

कलाविश्वात आजपर्यंत अनेक कलाकारांचे अफेअर्स गाजले. मात्र, यात अमिताभ बच्चन (amitabh bachchan) आणि रेखा (rekha) यांच्यातील नातं कायम गूढ राहिलं. या दोघांच्या अफेअरची चर्चा अनेकदा झाली. मात्र, दोघांनीही याविषयी मौन बाळगणं पसंत केलं. यामध्येच सध्या या दोघांचा एक थ्रोबॅक किस्सा चर्चिला जात आहे. यात रेखासाठीअमिताभ बच्चन यांनी चक्क एका व्यक्तीला मारहाण केली होती.

१९७६ मध्ये प्रदर्शित झालेला 'दो अनजाने' हा चित्रपट साऱ्यांच्या लक्षात असेल. या चित्रपटात रेखा आणि बिग बी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. या चित्रपटाच्या काळातच या जोडीतील जवळीकता वाढली होती. परंतु, या दोघांनीही त्यांच्यातील नातं कधीच जाहीरपणे सांगितलं नाही. मात्र, 'गंगा की सौगंध' या चित्रपटादरम्यान अमिताभच्या एका कृतीमुळे त्यांच्यातील प्रेम दिसून आलं.

रेखासाठी बिग बींनी केली मारहाण

'गंगा की सौगंध' या चित्रपटाचं एका गावात चित्रीकरण सुरु होतं. यावेळी गावातील नागरिकांनी सेटवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यामध्येच गर्दीतील एका व्यक्तीने रेखासोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून युनिटमधील लोकांना या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्यास तयार नव्हता. अखेर संतापलेल्या बिग बींनी त्याला चांगला चोप दिला.

दरम्यान, यावेळी अमिताभ बच्चन यांना आलेला राग पाहून सेटवरील प्रत्येक जण थक्क झाला होता. यापूर्वी त्यांना इतकं रागात कधीच कोणी पाहिलं नव्हतं.  या प्रकारानंतर रेखा आणि बिग बींच्या नात्याविषयी अनेक चर्चांना उधाण आलं होतं. परंतु, या प्रकारानंतर ही जोडी १९८१ मध्ये सिलसिला या चित्रपटात अखेरची झळकली. त्यानंतर त्यांनी कधीच एकत्र काम केलं नाही.

टॅग्स :अमिताभ बच्चनरेखाबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा