Join us  

'या' व्यक्तीमुळे बिग बींनी उचलला होता रेखावर हात; सिनेमाच्या सेटवर लगावली होती अभिनेत्रीच्या कानशिलात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 1:19 PM

Amitabh bachchan: जयामुळे नव्हे तर 'या' डान्सरमुळे पडली होती बिग बी-रेखात फूट

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे अमिताभ बच्चन (amitabh bachchan) आणि रेखा (rekha). गेल्या कित्येक वर्षांपासून कलाविश्वावर राज्य करणाऱ्या या जोडीच्या अफेअरचे अनेक किस्से चर्चिले गेले.किंबहुना अद्यापही त्यांची चर्चा रंगते. यात खासकरुन त्यांच्यातील प्रेम, त्यांच्या आलेला दुरावा या गोष्टींची चर्चा रंगताना दिसते. मात्र, पहिल्यांदाच नेटकऱ्यांमध्ये त्यांच्यातील वादाची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. एकेकाळी रेखावर प्रेम करणाऱ्या बिग बींनी चक्क सगळ्यांसमोर त्यांच्या कानशिलात लगावली होती.

८० च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी लावारिस सिनेमात एका इराणी डान्सरसोबत स्क्रीन शेअर केली होती. या डान्सरसोबत बिग बींचं अफेअर असल्याची त्याकाळी मोठी चर्चा रंगली होती. ही बातमी रेखाच्या कानावरही पडली होती. ज्यामुळे रेखा प्रचंड संतापली. इतकंच नाही तर बिग बी आपली फसवणूक करतायेत असा तिचा समज झाला. ज्यामुळे त्यांच्याशी थेट बोलण्यासाठी ती त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर गेली. रेखा सेटवर आल्यानंतर बिग बी आणि तिची याविषयी चर्चा झाली. विशेष म्हणजे चर्चेपासून सुरु झालेलं हे बोलणं थेट वादापर्यंत पोहोचलं आणि रागाच्या भरात बिग बींनी रेखाच्या कानशिलात लगावली.

रेखाने घेतला मोठा निर्णय

बिग बींनी हात उचलल्यानंतर संतापलेल्या रेखाने एक मोठा निर्णय घेतला. अमिताभ आणि जया यांची भूमिका असलेल्या सिलसिला या सिनेमात काम करणार नसल्याचं तिने जाहीर करुन टाकलं. परंतु, चित्रपटाचे दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या समजुतीनंतर तिने हा चित्रपट करण्यास होकार दिला. 

टॅग्स :अमिताभ बच्चनजया बच्चनरेखाबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा