Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षे मी सगळं सोडलं होतं...पण किरण रावमुळे....; आमिर खानचा शॉकिंग खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 16:37 IST

Aamir Khan : होय, कोरोना काळात आमिरने अभिनयाला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता. वाचा, काय म्हणाला आमिर...?

 Aamir Khan Thought Of Quitting Films : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान (Aamir Khan)  याचा एक खास चाहतावर्ग आहे. आमिरचे सिनेमे, त्यात त्याने  साकारलेल्या एकापेक्षा एक सरस भूमिका चाहत्यांच्या काळजावर कोरल्या गेल्या आहेत. याच आमिरने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला. होय, कोरोना काळात आमिरने अभिनयाला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता.  अभिनय नेहमीसाठी सोडण्याच्या निर्णयापर्यंत तो आला होता. खासगी आयुष्य आणि अन्य काही कारणांमुळे आमिरने हा निर्णय घेतला होता. केवळ इतकंच नाही तर दोन वर्षे त्याने सगळं सोडून दिलं होतं. त्याच्या निर्णयाने त्याचे कुटुंबही हैरान झालं होतं. त्याची पत्नी(एक्स वाईफ किरण राव) तर भावुक झाली होती. अखेर मुलांनी, बायकोने समजवलं आणि त्यानंतर कुठे आमिरने अ‍ॅक्टिंग सोडण्याचा निर्णय मागे घेतला. दोन वर्षानंतर तो पुन्हा परतला. एबीपीच्या एका कार्यक्रमात आमिर यावर बोलला. 

काय म्हणाला आमिर...?‘कोरोनाच्या काळात मी अभिनय सोडण्याचा घेण्याचा निर्णय  घेतला होता. मी फक्त सिनेमे प्रोड्यूस करणार, हा माझा निर्णय मी कुटुंबालाही सांगितला होता. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. माझं कुटुंब माझा निर्णय ऐकून हैराण झालं होतं. माझ्या मुलांनी आणि किरणने मला असं करण्यापासून थांबवलं. मी हे चुकीचं करत असल्याचं त्यांनी मला सांगितलं. त्यांनी मला व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यात बॅलन्स करायला सांगितलं. त्यांनतर मी माझा विचार बदलला आणि पुन्हा परतलो,’असं आमिर म्हणाला.

मी हिरो होतो आणि स्वार्थी....मी हिरो बनलो होतो आणि माझ्या कामात अगदी मग्न झालो होते. मी सगळ्यांनाच गृहित धरायला लागलो होतो. एकाक्षणी मला साक्षात्कार झाला. आपण किती स्वार्थी आहोत, असं मला वाटू लागलं होतं. वयाच्या 56-57 व्या वर्षी मला जाणीव झाली. मी कुटुंबासोबत आहे. पण ज्याप्रमाणे असायला हवं तसा नाही, हे मला कळलं. यानंतर मी माझ्या चुका सुधारणं सुरू केलं, असंही त्याने सांगितलं.

टॅग्स :आमिर खानबॉलिवूड