Join us

शाहरूखच्या ‘लंच प्लेट’मध्ये हे काय??

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 13:06 IST

शाहरूख खान सध्या जे वागतोय, ते पाहून कुणालाही आश्चर्यच वाटेल. कधी कुठली महिला त्याच्या पाठीवर बसलेली दिसते तर कधी ...

शाहरूख खान सध्या जे वागतोय, ते पाहून कुणालाही आश्चर्यच वाटेल. कधी कुठली महिला त्याच्या पाठीवर बसलेली दिसते तर कधी शाहरूख स्वत: लहान मुलांसारखा रेलिंगवर स्लाईड करताना दिसतोय. आता तर शाहरूखच्या खाण्याच्या आवडी-निवडीही बदललेल्या दिसताहेत. त्याच्या प्लेटमध्ये ठेवलेली ही डिश बघाच. ती बघून तुमचे डोळेही पांढरे होतील. सध्या शाहरूख इम्तियाज अलीच्या ‘दी रिंग’ची शुटिंग करतोय. प्राग आणि अ‍ॅम्सटरडमनंतर लिस्बनमध्ये शूटींग शेड्यूल ‘दी रिंग’चे शुटींग सुरू आहे. येथील लंचदरम्यानचा फोटो शाहरूखने शेअर केला आहे. ‘सेटवर लंचब्रेक़ तुम्ही अशी कुठलीही गोष्ट कशी खाऊ शकता, जी इतकी भयावह दिसत असेल आणि ज्याला तीन हृदय असतील...’,असे कॅप्शन त्याने दिले आहे. आता ही स्टारफिश सारखी दिसणारी डिश खरोखरीच शाहरूखने ट्राय केली वा नाही, हे तर ठाऊक नाही. पण ही डिश ट्राय करणे शाहरूखसाठी सोपे नक्कीच नसणार, इतके मात्र खरे!