Join us

​सलमान खाद्यपदार्थ असता तर काय असता? कॅटरिनाने दिले उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 16:02 IST

koffee with karan katrina kaif has something to say about ex salman khan watch video : करण जोहरचा ‘कॉफी विद करण’ हा चॅट शो सध्या जाम हसायला लावतोय. सलमान एखादा खाद्य पदार्थ असता तर तो कोणता असता? असा प्रश्न करण जोहरने कॅटरिना कैफला विचारला. बिच्चा-या साध्या-भोळ्या कॅटरिनाला हा प्रश्न जरा किचकट वाटला. त्यामुळे ‘इट्स ट्रिकी’ असे उत्तर तिने दिले.

करण जोहरचा ‘कॉफी विद करण’ हा चॅट शो सध्या जाम हसायला लावतोय. नुकतेच करणच्या या शोमध्ये आमिर खान त्याच्या ‘दंगल’मधील आॅनस्क्रीन मुलींसह हजेरी लावून  गेला. आमिरनंतर कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा या दोघी या चॅटशोमध्ये येणार आहेत. या भागाचे चित्रीकरण नुकतेच पार पडले. संबंधित वाहिनीने या एपिसोडचे एक फुटेज twitterवर जारी केले आहे. यात करण जोहर कॅटरिनाला तिच्या एक्सबद्दल एक प्रश्न करतो. हा एक्स कोण तर सलमान खान. करणने विचारलेल्या या प्रश्नाचीच सध्या जाम चर्चा आहे. होय, सलमान एखादा खाद्य पदार्थ असता तर तो कोणता असता? असा प्रश्न करणने कॅटरिनाला विचारला. बिच्चा-या साध्या-भोळ्या कॅटरिनाला हा प्रश्न जरा किचकट वाटला. त्यामुळे ‘इट्स ट्रिकी’ असे उत्तर तिने दिले. पण इथेच जरा घोळ झाला. कॅटरिनाने ‘इट्स ट्रिकी’ म्हटले अन् अनुष्काने ते ‘इट्स चिक्की’ असे ऐकले. मग काय, करणच्या शोमध्ये एकख खसखस पिकली. याच धम्माल मस्तीत अर्जून कपूर याची सरप्राईज एन्ट्री झालेलीही ‘कॉफी विद करण’ या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. यापूर्वी   रणबीर कपूर आणि रणवीर सिंग ‘कॉफी विद करण’मध्ये आले होते, तेव्हाही अर्जुन कपूरने या दोघांसोबत एक खेळ खेळला होता. लवकरच कॅटरिना, अनुष्का व अर्जून यांच्या धम्माल मस्तीचा एपिसोड टेलिकास्ट होणार आहे.}}}}  कतरिना कैफ लवकरच ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि कॅटरिना मुख्य भूमिकेत आहेत. नुकतेच कॅटरिना व रणबीरचे ब्रेकअप झाले. अशास्थितीत या दोघांची आॅनस्क्रिन केमिस्ट्री पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  अनुष्कचाही ‘द रिंग’ आणि ‘फिल्लौरी’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.