Join us

‘धूम4’मधून बॉलिवूड डेब्यू करणार काय ​प्रभास ? जाणून घ्या उत्तर...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2016 14:05 IST

बहुप्रतिक्षीत ‘बाहुबली2’ अर्थात ‘बाहुबली: दी कन्क्लुजन’मधील तेलगू सुपरस्टार प्रभासचा फर्स्ट लूक काल शनिवारी (प्रभासच्या वाढदिवशी) सर्वांसमोर आला. मामी फिल्म ...

बहुप्रतिक्षीत ‘बाहुबली2’ अर्थात ‘बाहुबली: दी कन्क्लुजन’मधील तेलगू सुपरस्टार प्रभासचा फर्स्ट लूक काल शनिवारी (प्रभासच्या वाढदिवशी) सर्वांसमोर आला. मामी फिल्म फेस्टिवलमध्ये ‘बाहुबली2’चे पहिले पोस्टर जारी करण्यात आले. या पोस्टरमध्ये साखळदंडांमध्ये जखडलेला, आक्रमक लूकमधील प्रभास दिसतो आहे.‘बाहुबली’ 2015 मध्ये  खांद्यावर विशाल शिवलिंग उचललेला  प्रभास पाहून चित्रपटरसिक थक्क झाले होते. ‘बाहुबली2’मधील प्रभासचा लूकही एकदम हटके आहे. ‘बाहुबली’ने प्रभासला कधी नव्हे इतकी लोकप्रीयता मिळवून दिली. अख्खे बॉलिवूड आणि बॉलिवूडप्रेमीही प्रभासच्या प्रेमात पडले. हाच प्रभास बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळते आहे.केवळ एवढेच नाही तर यशराज बॅनरच्या ‘धूम4’मधून प्रभास बॉलिवूड डेब्यू करणार, अशीही चर्चा आहे. अर्थात प्रभासने ही चर्चा नाकारली आहे. काल पोस्टर  लॉन्च सोहळ्यात प्रभासला याबद्दल विचारण्यात आले. यावर प्रभासने नकारार्थी उत्तर दिले. बॉलिवूडच्या काही चांगल्या आॅफर्स मला मिळाल्या, हे खरे आहे. मला बॉलिवूडमध्ये कामच करायचे नाही, असे मी म्हणणार नाही.उलट बॉलिवूडमध्ये काम करायला मला मनापासून आवडेल. पण सध्या माझ्याकडे माझ्याच होमप्रॉडक्शन्सचे दोन सिनेमे आहे. ते पूर्ण झाल्याशिवाय मी कुठलेही नवे चित्रपट स्वीकारणार नाही, असे प्रभासने स्पष्ट केले. ‘धूम4’चा प्रस्ताव मिळाला आहे का? असे स्पष्टचं विचारल्यावर,नाही,अद्याप तरी नाही, असे तो म्हणाला. अर्थात मोठे प्रस्ताव नाकारावे लागेल, याबद्दल प्रभासला जराही खंत नाही. कारण सध्या तो ‘बाहुबली2’मध्ये बिझी आहे आणि ‘एक बाहुबली, १०० चित्रपटांसारखा आहे,’असे प्रभासचे मत आहे. आता असे असताना चिंता नकोच...काय प्रभास?